Lokmat Sakhi >Food > २ कप बेसन-एक पाकीट ब्रेड, करून पाहा झणझणीत कोल्हापुरी बेसन मसाला ब्रेड, चवीला भन्नाट-खा पोटभर

२ कप बेसन-एक पाकीट ब्रेड, करून पाहा झणझणीत कोल्हापुरी बेसन मसाला ब्रेड, चवीला भन्नाट-खा पोटभर

For tiffin make Kolhapuri special Spicy Besan Masala Bread Recipe : दिवाळीची सुट्टी संपली, मुलं शाळेत जायला लागली, त्यांना टिफिनला द्या कोल्हापुरी बेसन मसाला ब्रेड, डबा होईल फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2023 12:13 PM2023-11-28T12:13:32+5:302023-11-28T12:14:14+5:30

For tiffin make Kolhapuri special Spicy Besan Masala Bread Recipe : दिवाळीची सुट्टी संपली, मुलं शाळेत जायला लागली, त्यांना टिफिनला द्या कोल्हापुरी बेसन मसाला ब्रेड, डबा होईल फस्त

For tiffin make Kolhapuri special Spicy Besan Masala Bread Recipe | २ कप बेसन-एक पाकीट ब्रेड, करून पाहा झणझणीत कोल्हापुरी बेसन मसाला ब्रेड, चवीला भन्नाट-खा पोटभर

२ कप बेसन-एक पाकीट ब्रेड, करून पाहा झणझणीत कोल्हापुरी बेसन मसाला ब्रेड, चवीला भन्नाट-खा पोटभर

कोल्हापूर म्हणजे दक्षिण काशी. या ठिकाणी बघण्यासारखं, फिरण्यासारखं आणि खाण्यासारखं बरंच काही आहे. मुख्य म्हणजे कोल्हापुरात खाण्याचे शौकीन आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. इथल्या खवय्यावर्गाला झणझणीत पदार्थ फार आवडतात. इथले लोकं मिसळ ब्रेड, वडा ब्रेड आवर्जून खातात. या ठिकाणी पाव नसून ब्रेड मिळते.

ब्रेडचे अनेक पदार्थ केले जातात. पण आपण कधी कोल्हापुरी बेसन मसाला ब्रेड खाऊन पाहिलं आहे का? सायंकाळची छोटीशी भूक भागवण्यासाठी किंवा सकाळी नाश्त्यामध्ये आपण कोल्हापुरी बेसन मसाला ब्रेड खाऊ शकता. ही रेसिपी करायला सोपी आणि चवीला भन्नाट तयार होते. चला तर मग झणझणीत कोल्हापुरी बेसन मसाला ब्रेड कसे तयार करायचे पाहूयात(For tiffin make Kolhapuri special Spicy Besan Masala Bread Recipe).

कोल्हापुरी बेसन मसाला ब्रेड करण्यासाठी लागणारं साहित्य

ब्रेड

बेसन

आलं-लसूण-जिरे-हिरवी मिरची पेस्ट

कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला चटणी

कोल्हापुरी लाल मिरची पावडर

ओवा

कोथिंबीर

२ टोमॅटो-कपभर तांदूळ, पाहा चटपटीत पण पौष्टीक डोशाची सोपी कृती, न आंबवता डोसा होईल काही मिनिटात रेडी

मीठ

तीळ

तेल

कृती

सर्वप्रथम, खलबत्त्यात आलं, लसूण, जिरे आणि हिरवी मिरची घालून ठेचून घ्या. तयार ठेचा एका प्लेटमध्ये काढून घ्या. एका बाऊलमध्ये २ कप बेसन, आलं-लसूण-जिरे-हिरवी मिरची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा ओवा, एक चमचा कांदा-लसूण मसाला, एक चमचा कोल्हपुरी लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून सरसरीत बॅटर तयार करा.

२ कप ज्वारीचा करा कुरकुरीत पौष्टीक डोसा, ग्लुटेन फ्री रेसिपी वेट लॉससाठी उत्तम-चवीला जबरदस्त

दुसरीकडे कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. ब्रेड बेसनाच्या बॅटरमध्ये बुडवून त्यावर तीळ चिटकवा. नंतर गरम तेलात ब्रेड सोडून दोन्ही बाजूने तळून घ्या. जर आपल्याला ब्रेड तळायचे नसतील तर, आपण पॅनवर दोन्ही बाजूने भाजूनही घेऊ शकता. अशा प्रकारे कोल्हापुरी बेसन मसाला ब्रेड खाण्यासाठी रेडी.

Web Title: For tiffin make Kolhapuri special Spicy Besan Masala Bread Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.