Join us  

Cooking Tips: चणे, राजमा भिजत टाकायलाच विसरलात, थांबा.. बेत बदलू नका, ही घ्या ट्रिक.. एका तासात भिजतील चणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2022 1:07 PM

Cooking Tips: काही जणींच्या बाबतीत ही अगदी नेहमीची गोष्ट... पण असं झालं तरी टेन्शन घेऊ नका.. ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळेत तुम्ही चणे किंवा राजमा (how to soak chana and rajma) करू शकाल हे नक्की...

ठळक मुद्दे तुमच्या बाबतीत असं झालंच तर गोंधळून जाऊ नका. हा सोपा उपाय करून बघा

उद्या स्वयंपाकात काय करायचं, हे बहुतांश जणींचं आदल्या दिवशी रात्रीच ठरलेलं असतं. त्यामुळे मग काही जणी त्यांच्या वेळेनुसार रात्रीच थोडी तयारी करून ठेवतात. तयारी झाली नाही, तरी एरवी फार काही बिघडत नाही. पण जेव्हा दुसऱ्यादिवशी कडधान्याची उसळ किंवा राजमा, चणे, छोले असं काही करायचं ठरलेलं असतं आणि नेमकं आदल्या दिवशी रात्री ते भिजत घालायला आपण विसरतो (Forgot to soak chana, rajma at night) तेव्हा मात्र गोंधळ उडतो आणि मग ऐनवेळी ठरलेला बेत बदलावा लागतो. असं जर तुमचं होत असेल, तर हा उपाय जसा काही तुमच्यासाठीच आहे, असं समजा..

 

बऱ्याचदा असंही होतं की पाहूणे घरी येणार असल्याचं ३- ४ तास आधी समजतं. मग अशावेळी असंही वाटतं की पाहूणे येणार हे कालच समजलं असतं तर चणे, राजमा रात्रीच भिजत टाकून आज काही खास बेत करता आला असता. आता हा सोपा उपाय वापरून तुम्ही ३ ते ४ तासांतच राजमा किंवा चणे किंवा कडधान्यांची उसळ करण्याचा विचार करू शकता..

 

चणे- राजमा ऐनवेळी भिजविण्याचा उपाय... (how to soak chana, rajma within an hour)एक कढईत एक कप पाणी टाकून ते उकळून घ्या. पाणी उकळलं की ते घट्ट झाकण असलेल्या स्टीलच्या डब्यात टाका किंवा मग एअर टाईट डब्यात टाका. या डब्यात लगेचच धुतलेले राजमा किंवा चणे टाका आणि डब्याचं झाकण चटकन पक्क लावून घ्या. ही सगळी क्रिया आपल्याला अतिशय जलद करायची आहे. आता याच स्थितीत हा डबा अर्धा तास राहू द्या. पाणी थंड झाल्यानंतर डब्याचं झाकण उघडा. चणे किंवा राजमा छान भिजलेला असेल. अशा प्रकारे भिजवलेला राजमा किंवा चणे प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवून घ्या आणि हवी ते रेसिपी करा.. 

 

टॅग्स :अन्नकिचन टिप्सपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.