Join us  

French fries recipe : कुरकुरीत, चविष्ट फ्रेंच फ्राईजची 'ही' रेसेपी ट्राय कराल; तर हॉटेल्समधल्या फ्राईजची चव कायमची विसराल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 3:48 PM

French fries recipe : या टिप्सचा वापर करून तुम्ही घरच्याघरी कुरकुरीत, खमंग फ्रेंच फ्राईज बनवू शकता. 

ठळक मुद्देघरी फ्रेच फ्राईज बनवायचं म्हटलं तर हवे तसे बनत नाहीत. बटाटे खूप जास्त तेल शोशून घेतात त्यामुळे तेलकट चव लागते किंवा लगेचच नरम पडतात.नेहमीच बर्गर आऊटलेट किंवा हॉटेलमध्ये जाऊन  फ्राईज खाणं किंवा घरी मागवणं शक्य होत नाही. पण मधल्या वेळेत खूप भूक लागली तर फ्रेंच फ्राईज खायची इच्छा होते.

आजकाल बटाट्याचे काप नाही, तर फ्रेंच फ्राईजची जास्त केंझ जास्त पाहायला मिळते. तुम्ही जिथेही जाता तिथं फ्रेच फ्राईज खाणारे लोक तुम्हाला दिसून येतील. नेहमीच बर्गर आऊटलेट किंवा हॉटेलमध्ये जाऊन  फ्राईज खाणं किंवा घरी मागवणं शक्य होत नाही. पण मधल्या वेळेत खूप भूक लागली तर फ्रेंच फ्राईज खायची इच्छा होते.

घरी फ्रेच फ्राईज बनवायचं म्हटलं तर हवे तसे बनत नाहीत. बटाटे खूप जास्त तेल शोशून घेतात त्यामुळे तेलकट चव लागते किंवा लगेचच नरम पडतात. तुमचंही असंच होत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही घरच्याघरी कुरकुरीत, खमंग फ्रेंच फ्राईज बनवू शकता. 

फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी लागणारं साहित्य

3 बटाटे

1 टिस्पून वेनेगर

1 टेबलस्पून मैदा

1 टेबलस्पून काँर्नफ्लाँवर

1 टिस्पून मीर पूड

1 टिस्पून मीठ

1 टिस्पून पेरीपेरी मसाला

250 ग्राम तेल तळायला

कृती

प्रथम बटाटे सोलून लांब -लांब स्लाईस मधे कापून घेऊ आणी 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. त्यात वेनेगर टाकून 1/2 तास ठेवून द्या. किंवा बटाट्याचे काप कोमट पाण्यात टाकावेत. त्यामुळे ते काळे पडत नाहीत आणि स्टार्च कमी होण्यात मदत होते. 

नंतर त्यातलं पाणी काढून पूर्ण सूकवून पूसून घ्या आणि  एका भांड्यात काढून त्यावर मैदा, काँर्नफ्लाँवर,मीरपूड टाकून एकत्र करून घ्या.

मग गँसवर कढईत तेल गरम करून कडक तेलात कूकरीत तळून घ्या आणि प्लेटमध्ये काढून ठेवा. एकसारखे चाळून रंग बदलायला लागल्यावर काप खाली काढावेत. तेल  निथळल्यावर सर्व्ह करण्यापूर्वी पुन्हा एकदा तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळावेत. 

गरमागरम फ्रेंच फ्राईज तयार आहेत. चवीपुरते मीठ टाकून खायला घ्या. पेरीपेरी मसाला, चाट मसाला फ्राईजवर तुम्ही टाकू शकता. फ्राईज चीझ डिप किंवा सॉससह  खायला तयार असतील. 

टॅग्स :अन्नपाककृती