Join us  

फक्त १ वाटी गव्हाचं पीठ वापरुन करा तळणीचे खुसखुशीत मोदक; बाप्पासाठी पारंपरिक नैवेद्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 4:25 PM

Fried Modak Recipe for Ganesh Chaturthi : हवंतर तुम्ही उकडीच्या मोदकांचं सारणंही या मोदकांसाठी वापरू शकता.

गणेशोत्सव (Ganesh Festival 2022) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. गणपतीच्या दिवसात मोदकांच्या नैवेद्याचे महत्व काही वेगळेच. प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात. (Modak Recipe in Marathi) उकडीचे मोदक गणपतीच्या पहिल्याच दिवशी बनल्यानंतर नंतरच्या दिवशी काय नैवेद्य बनवायचा असा प्रश्न अनेकांना पडतो. (Naivedya for Ganesha)बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही तळणीचे मोदक अगदी अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात बनवू शकता. यासाठी तुम्हाला जास्त साहित्य लागणार नाही. तुम्ही उकडीच्या मोदकांचं सारणंही या मोदकांसाठी वापरू शकता. (How to Make Talniche Modak)

साहित्य

1 वाटी गव्हाचे पीठ

2 चमचे बारीक रवा

1 चमचा तांदळाचे पीठ

1 सुक्या खोबऱ्याचा किस

बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटात करा ५ प्रकारचे मोदक; कमी वेळात नैवेद्य तयार

1 वाटी साजूक तूप तळण्यासाठी

वेलचीपूड

3/4 कप पीठीसाखर 

1 टीस्पून खसखस

20 ते २५ ड्रायफुट्सचेी भरड

तेलाचे मोहन

कृती

१) सगळ्यात आधी सुकं खोबरं, खसखस हलकं भाजून घ्या. यात  ड्रायफुट्सचे तुकडे किंवा भरड घालून मिक्स करा नंतर त्यात पिठी साखर घाला.

२) या मिश्रणात वेलचीपूड घाला. सारण तयार झाले की ते पूर्ण थंड होऊ द्या.

३) एका मोठ्या ताटात किंवा परातीत रवा, मीठ, तांदळाचं पीठ, गव्हाचे पीठ घाला. त्यात १ चमचा गरम तेलाचं मोहन घालून पीठ भिजवून घ्या. पीठ जास्त सैल नसेल याची खात्री करा. 

४) पुरीच्या पीठाप्रमाणे पीठ भिजवा. पिठाची पारी लाटून लगेच त्यात सारण भरा आणि मोदकाच्या पाकळ्यांचे आकार द्या. नंतर कढईत तूप गरम करायला ठेवा. तूप चांगलं गरम झाल्यानंतर मोदक गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. तयार आहे खुसखुशित तळणीच्या मोदकांचा नैवेद्य. 

टॅग्स :गणेशोत्सवअन्नगणेश चतुर्थी रेसिपीगणेशोत्सवपाककृती