Lokmat Sakhi >Food > गणेशोत्सव स्पेशल : तळणीच्या मोदकाचं आवरण मऊ पडतं, चिवट होतं? फक्त ५ टिप्स-मोदक होतील खुसखुशीत...

गणेशोत्सव स्पेशल : तळणीच्या मोदकाचं आवरण मऊ पडतं, चिवट होतं? फक्त ५ टिप्स-मोदक होतील खुसखुशीत...

Fried Modak Recipe : Talniche Modak : How to make Fried Modak : तळणीच्या मोदकांची सोपी रेसिपी मोदक होतील एकदम परफेक्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2024 07:22 PM2024-09-05T19:22:59+5:302024-09-05T19:33:41+5:30

Fried Modak Recipe : Talniche Modak : How to make Fried Modak : तळणीच्या मोदकांची सोपी रेसिपी मोदक होतील एकदम परफेक्ट...

fried modak recipe How to make Fried Modak Talniche Modak | गणेशोत्सव स्पेशल : तळणीच्या मोदकाचं आवरण मऊ पडतं, चिवट होतं? फक्त ५ टिप्स-मोदक होतील खुसखुशीत...

गणेशोत्सव स्पेशल : तळणीच्या मोदकाचं आवरण मऊ पडतं, चिवट होतं? फक्त ५ टिप्स-मोदक होतील खुसखुशीत...

गणपती बाप्पांच्या आगमनासाठी आता फक्त काही तासच बाकी राहिले आहेत. आत्तापर्यंत प्रत्त्येक घरी गणपती बाप्पांच्या आगमनाची अगदी जय्यत तयारी सुरु असेल. गणपती बाप्पांच्या मखरापासून ते नैवद्यापर्यंत सगळ्याच गोष्टींची लगबग सुरु असेल. गणपती बाप्पांचा नैवेद्य म्हटलं की त्यात मोदकाला पहिले स्थान. मोदकाशिवाय बाप्पांच्या नैवेद्य पूर्ण होऊच शकणार नाही(Talniche Modak).

गणपती बाप्पांसोबत घरातील प्रत्येक व्यक्तीला देखील मोदक खूप आवडतात. मोदक म्हटलं की तो मोदकच असतो, मग तो उकडीचा असो किंवा तळणीचा. उकडीचे मोदक तयार करायला जरा वेळ लागतो. याउलट तळणीचे मोदक अगदी झटपट बनून तयार होतात. यासाठी घाई गडबडीचा वेळी उकडीच्या मोदकांपेक्षा तळणीचे झटपट होणारे मोदक (Fried Modak Recipe) करण्यास प्राधान्य दिले जाते. झटपट होणाऱ्या तळणीच्या मोदकांची सोपी रेसिपी आणि त्याचे आवरण खुसखुशीत व्हावे यासाठी काही महत्वाच्या टिप्स पाहूयात(How to make Fried Modak).

साहित्य :- 

१. गव्हाचे पीठ - १ कप 
२. मैदा - १ कप 
३. रवा - १/२ कप 
४. गरम तेल - २ ते ३ टेबलस्पून 
५. मीठ - चवीनुसार 
६. पाणी - गरजेनुसार 
७. तूप - ३ ते ४ टेबलस्पून 
८. खसखस - १ टेबलस्पून 
९. ओलं खोबरं - २ कप 
१०. गूळ - १ ते १, १/२ कप 
११. काजू - बदाम काप - १/२ कप 
१२. तेल - तळण्यासाठी 
१३. वेलची पूड - १/२ टेबलस्पून 

गणेशोत्सव स्पेशल : घरीच झटपट करा रसमलाई मोदक, कपभर पनीर आणि फक्त १० मिनिटांत मोदक तयार...


कृती :- 

१. सगळ्यांत आधी एका मोठ्या डिशमध्ये गव्हाचे पीठ, मैदा, रवा, गरम तेल, चवीनुसार मीठ, गरजेनुसार हळुहळु पाणी घालून चपात्यांच्या कणके प्रमाणे पीठ मळून घ्यावे. पीठ मळून झाल्यांनतर अर्धा तास हे पीठ झाकून ठेवावे. 
२. आता एका पॅनमध्ये थोडे तूप घेऊन त्यात खसखस, ओलं खोबरं, गूळ, काजू - बदाम काप घालून सगळे जिन्नस हलके शिजवून मोदकातील गोड सारण तयार करून घ्यावे. 
३. त्यानंर आपण कणकेप्रमाणे जे पीठ मळून घेतले आहे त्याचे छोटे गोळे करून पुरीच्या आकाराची गोलाकार मोदकाची पारी लाटून घ्यावी. 
४. पारी लाटून झाल्यानंतर या गोलाकार पारीच्या बरोबर मधोमध तयार करून घेतलेले ओल्या खोबऱ्याचे सारण भरुन घ्यावे. सारण भरून घेतल्यानंतर मोदकाच्या कळ्या पाडून घ्याव्यात. 
५. एका मोठ्या कढईमध्ये तेल घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. या गरम तेलात मोदक सोडून हलका गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्यावेत. 

गौरी गणपती स्पेशल : फक्त १५ मिनिटांत करा कापसाच्या फुलांची सुंदर-नाजूक कंठी, पाहा भन्नाट आयडिया...

तळणीच्या मोदकाचे आवरण खुसखुशीत होण्यासाठी... 

१. तळणीच्या मोदकाचे आवरण खुसखुशीत होण्यासाठी गव्हाच्या पीठासोबत त्यात थोडा रवा घालावा. 
२. पीठ मळताना ते कणकेच्या पिठाप्रमाणेच मळावे परंतु पातळ न मळता पीठ घट्ट मळावे.  
३. तळणीच्या मोदकासाठी पीठ मळत असतांना त्यात तेल किंवा तूप गरम करून घालावे. 
४. मोदक तळण्यासाठी कढईत सोडताना तेल आधी व्यवस्थित गरम करून घ्यावे. तेल जर नीट तापलेले नसेल तर मोदकाचे आवरण नीट तळले जात नाही परिणामी, ते आवरण चिवट होते. 
५. तळणीच्या मोदकासाठी कणीक भिजवून झाल्यावर ती अर्धा तास झाकून ठेवावी. यामुळे त्यात तेल, पाणी मुरुन कणीक मऊ होण्यास मदत मिळते. यामुळे मोदकाचे आवरण खुसखुशीत होते.

Web Title: fried modak recipe How to make Fried Modak Talniche Modak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.