Lokmat Sakhi >Food > Children's Day Special : या बालदिनापासून मुलांना द्या ३ एनर्जेटिक ड्रिंक्स, इम्यूनिटी वाढेल, आरोग्य राहील उत्तम

Children's Day Special : या बालदिनापासून मुलांना द्या ३ एनर्जेटिक ड्रिंक्स, इम्यूनिटी वाढेल, आरोग्य राहील उत्तम

Children's Day Special Drinks बालदिन विशेष, मुलांना घरगुती द्या ३ पेय, जे मुलांना करतील आतून मजबूत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2022 01:28 PM2022-11-14T13:28:41+5:302022-11-14T13:30:36+5:30

Children's Day Special Drinks बालदिन विशेष, मुलांना घरगुती द्या ३ पेय, जे मुलांना करतील आतून मजबूत..

From this children's day, give children 3 energetic drinks, immunity will increase, health will be good | Children's Day Special : या बालदिनापासून मुलांना द्या ३ एनर्जेटिक ड्रिंक्स, इम्यूनिटी वाढेल, आरोग्य राहील उत्तम

Children's Day Special : या बालदिनापासून मुलांना द्या ३ एनर्जेटिक ड्रिंक्स, इम्यूनिटी वाढेल, आरोग्य राहील उत्तम

आज भारतभर बालदिन सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. या दिवसाची प्रत्येक बालक आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला. त्यांना मुलांबद्दल खूप आपुलकी, प्रेम आणि आपुलकी होती. मुले हिच राष्ट्राची खरी ताकद आणि समाजाचा पाया आहेत असे ते म्हणायचे. त्यामुळे १४ नोव्हेंबर हा दिवस देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो. मुलांना समर्पित या खास दिवशी, बदलत्या ऋतूमध्ये त्यांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी आहारात कोणत्या 3 पेयांचा समावेश करणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया.

हळदीचे दूध

हळदीच्या दुधाला सोनेरी दूध असेही म्हणतात. या दुधामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-फंगल गुणधर्म मुलांना विविध आजारांपासून वाचवतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे हे दूध मुलांना सर्दी, खोकला, फ्लू आणि बदलत्या ऋतूमुळे होणाऱ्या आजारांवर मात करण्यास मदत करते.

तुळशीचा काढा

तुळशीच्या पानात अँटी-ऑक्सिडंट, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुण आहेत. जे हिवाळ्यात मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. हा काढा बनवण्यासाठी सर्वप्रथम पाण्यात तुळशीची पाने, दालचिनी पावडर, काळी मिरी पावडर, आले, काही मनुके आणि गूळ घालून उकळून घ्या आणि अशाप्रकारे काढा तयार करू शकता.

लिंबाचा रस

लिंबूवर्गीय फळांमध्ये केवळ सी आणि ए जीवनसत्त्वेच नसून, त्यामध्ये भरपूर प्रमाणात फ्लेव्होनॉइड्स आहे. जे आपल्या पाल्यांना अनेक रोगांपासून बचाव करण्यास मदत करते. यासाठी आपण संत्री, मोसमी इत्यादी फळांचा रस काढून मुलांना पिण्यास देऊ शकता. मुख्यतः या फळांच्या ज्यूसमुळे मुलांची रोगप्रतिकारकशक्ती दुपट्टीने वाढते.

Web Title: From this children's day, give children 3 energetic drinks, immunity will increase, health will be good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.