फळांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी किती फायद्याचे आहे याची तुम्हाला कल्पना असेलच. डायटिशियन आणि डॉक्टरर्ससुद्धा भाज्यांव्यतिरिक्त फळं खाण्याचा सल्ला देतात. जर तुम्ही रोज पुरेश्या प्रमाणात फळांचे सेवन केले तर तुम्हाला आरोग्यविषयक अनेक फायदे मिळू शकतात. माहामारीच्या काळात रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होणं महत्वाचं आहे. यासाठी लोक वेगवेगळ्या फळांचा आणि पोषक तत्वांचा आपल्या आहारात समावेश करत आहेत.
आज आम्ही तुम्हाला फळांचे सेवन करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात याबाबत सांगणार आहोत.
तुम्ही ज्या पद्धतीनं फळांचे सेवन करता त्या पद्धतीनं पूर्ण पोषण तुम्हाला मिळेल का? फळांचे सेवन साल काढून करायला हवं की सालासकट? याबाबत लाइफस्टाइल आणि वेलनेस एक्सपर्ट डॉ. सिद्धांत भार्गव यांनी व्हिडीओच्या माध्यमातून फळं खाण्याचे योग्य मार्ग सांगितले आहेत.
फळं सालं काढून खाणं कितपत योग्य?
लोकांच्या मनात अनेकदा संभ्रम निर्माण होतो की,फळे आणि भाज्या त्यांच्या सालीसकट खाव्यात की नाही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जेव्हा तुम्ही सालीसकट फळं खाता तेव्हा तुम्हाला त्यातील पोषण तत्व पूर्णपणे मिळतात. व्हिडीओमध्ये त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जी फळं सालीसकट खाल्ली जाऊ शकतात. त्याचे सेवन सालांसकट करायला हवे. नेहमीच शरीराला पुरेपूर फायबर्स मिळण्यासाठी सालीसकट फळं खाण्याचा प्रयत्न करा.
बरेच लोक सफरचंद सोलून खातात, जे त्याचे फायबर वेगळे करते. अशा परिस्थितीत डॉक्टर सिद्धांत म्हणतात, 'सफरचंद सोलू नका, संत्री, मोसंबी त्याच्या तंतुमय सालांसह खा. याशिवाय न सोलता पेरू आणि मनुका खा. कृपया आपल्याला आवश्यक नसल्यास फळाची साल सोलणे टाळा. हे आपल्या शरीरास अधिक पोषक देईल, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
डॉक्टरांनी सालासकट फळं खाण्याचा सल्ला दिला असल्याने अशा परिस्थितीत केळीही त्याच प्रकारे खावी का, हा प्रश्न लोकांच्या मनातही निर्माण झाला पाहिजे? तर उत्तर होय आहे. तज्ज्ञांच्या मते केळीसुद्धा सालांसकट खायला हवी. फळाच्या सालीमध्ये त्याच्या लगद्याप्रमाणे कार्बोहायड्रेट, जीवनसत्त्वे बी 6, बी 12, पोटॅशियम, मॅग्नेशियम देखील असतात. केळीच्या सालाच्या आतील भागाला दात घासल्याने दातांचा पिवळटपणा दूर होतो. लक्षात घ्या तुम्ही तर केळी किंवा कोणतंही फळ सालासकट खात असाल तर ते व्यवस्थित धुवून स्वच्छ करून घ्यायला हवं.
त्यांनी पुढे सांगितले की, ''फळे आणि भाज्यांच्या सालामध्ये आवश्यक पौष्टिक पदार्थ असतात. फळांच्या सालामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळते. तुमचा विश्वास बसणारनाही पण फळातील जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे पौष्टिक फायदे 25-30 टक्के त्याच्या सालांमध्ये आहेत. म्हणून आपण त्यांना न सोलता खावे. याव्यतिरिक्त, पीअर, मनुके, द्राक्षे, सफरचंद, पेरू, आणि संत्र्याची पांढरी सालं ज्याला न सोलता खाऊ शकतो.''
वजन कमी करण्यास मदत होते
बर्याच अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की तंतुमय सालांसह फळांचे सेवन केल्याने आपली भूक नियंत्रणात राहते. याद्वारे आपण अनावश्यक खाणे टाळता. सोललेली फळे आणि भाज्या केवळ आपल्या आहारात पोषकद्रव्ये वाढवत नाहीत तर वजन कमी करण्यास देखील मदत करतात.
सालं काढण्यापेक्षा फळं साफ करून खा.
स्वच्छतेच्या कारणास्तव तुम्ही फळं आणि भाज्यांची सालं फेकून देता. पण डॉ. भार्गव यांच्यामते जर तुम्ही फळं किंवा भाज्या सालं न काढता वापरत असाल तर तुम्ही कोमट पाण्यानं धुवून मगच वापरायला हव्यात.