Lokmat Sakhi >Food > कमीतकमी तेलात भजी-वडे तळण्यासाठी ३ टिप्स, अगदी कमी तेलातही पदार्थ होईल खमंग

कमीतकमी तेलात भजी-वडे तळण्यासाठी ३ टिप्स, अगदी कमी तेलातही पदार्थ होईल खमंग

Frying Without Oil : तेलाचे दर महागल्यानं रोजच भरपूर तेलात पदार्थ करणं परवडतही नाही. कधी कधी जास्त तेल वापरूनही भजी, वडे नरम पडतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 10:16 AM2022-07-21T10:16:00+5:302022-07-21T12:28:35+5:30

Frying Without Oil : तेलाचे दर महागल्यानं रोजच भरपूर तेलात पदार्थ करणं परवडतही नाही. कधी कधी जास्त तेल वापरूनही भजी, वडे नरम पडतात.

Frying Without Oil : How to fry less oily pakodas by pankaj bhadouria | कमीतकमी तेलात भजी-वडे तळण्यासाठी ३ टिप्स, अगदी कमी तेलातही पदार्थ होईल खमंग

कमीतकमी तेलात भजी-वडे तळण्यासाठी ३ टिप्स, अगदी कमी तेलातही पदार्थ होईल खमंग

पावसाळ्याच्या वातावरणात भजी, वडे खायची इच्छा अनेकांची होते. पण भजी तळण्यासाठी तेल खूप लागतं. जास्त तेलकट पदार्थ खाल्यानंतर खोकला, कफ तर  उद्भवतोच. (Indian Cooking Tips) याशिवाय तेलाचे दर महागल्यानं रोजच भरपूर तेलात पदार्थ करणं परवडतही नाही. कधी कधी जास्त तेल वापरूनही भजी, वडे नरम पडतात. (How to fry less oily pakodas by pankaj bhadouria) अतिरिक्त तेल आरोग्यासाठी हानिकारक आहे कारण वजन वाढण्यापासून ते कोलेस्ट्रॉल वाढण्यापर्यंत, तेल आपल्या आरोग्यास हानी पोहोचवण्याचे काम करते. पण जर तुम्हाला कमी तेलात पकोडे तळायचे असतील तर तुम्ही मास्टरशेफ पंकज भदौरिया यांच्या टिप्स फॉलो करू शकता. (Make Your Pakodas Absorb Less Oil)

१) तेलाचं तापमान

भजी, वडे बनवताना तेलाचे तापमान लक्षात ठेवा. तेल जास्त गरम किंवा खूप थंड असू नये. कारण थंड तेलात  वडे तळले तर जास्त तेल शोषून घेतात. दुसरीकडे, जर तुम्ही खूप गरम तेलात वडे तळले तर वडे वरून काळे होतील पण आतून कच्चे राहतील. त्यामुळे भजी  तळताना तेलाचे तापमान मध्यम ठेवा. (How to make Pakora with less oil)


 

जेवण करताना कांदे, मसाले जळाले तर 3 टिप्स वापरा; फोडणी करपूनही स्वयंपाक होईल चवदार

२) तेलात मीठ घाला

ही टिप तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.  पंकज भदौरिया सांगतात की जेव्हाही तुम्ही भजी तळाल तेव्हा तेलात थोडे मीठ टाका. कारण मीठ घातल्याने पकोडे स्वतःमध्ये कमी तेल शोषून घेतील आणि आतून चांगले तळले जातील. पण तेलात जास्त मीठ घालू नका कारण जास्त मीठ घातल्यास भजी खारट होतील.

कांदा, लसणाशिवाय बनवा घट्ट, चविष्ट ग्रेव्ही; 4 ट्रिक्स, कमी साहित्यात स्वयंपाक होईल चवदार

३) असं पाहा तेलाचं तापमान

जर तुम्हाला तेलाच्या तापमानाची अचूक कल्पना येत नसेल, तर तुम्ही पंकज भदौरिया यांनी दिलेल्या टीपचे अनुसरण करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक स्टिक घ्यावी लागेल, ज्याच्या मदतीने तुम्ही तेलाचे तापमान तपासू शकता. हे तपासण्यासाठी तेल गरम झाल्यावर स्टीक तेलात घालावी लागेल.  स्टिक घातल्यानंतर तेलातून बुडबुडे उठले तर पकोडे तळण्यासाठी तेल तयार आहे.(Oil-Free Pakodas)..
 

Web Title: Frying Without Oil : How to fry less oily pakodas by pankaj bhadouria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.