Lokmat Sakhi >Food > वापरलेल्या तेलातच पुन्हा पुन्हा तळले पदार्थ तर होऊ शकतो कॅन्सर, FSSAI चा इशारा- विकतचे पदार्थ घेताना..

वापरलेल्या तेलातच पुन्हा पुन्हा तळले पदार्थ तर होऊ शकतो कॅन्सर, FSSAI चा इशारा- विकतचे पदार्थ घेताना..

Fssai Seizes 1780 Litre Of Reheated Cooking Oil : तेल वारंवार गरम करून खाल्ल्यानं याच्या वापरानं गंभीर समस्या उद्भवू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 06:38 PM2024-10-30T18:38:13+5:302024-10-30T18:40:49+5:30

Fssai Seizes 1780 Litre Of Reheated Cooking Oil : तेल वारंवार गरम करून खाल्ल्यानं याच्या वापरानं गंभीर समस्या उद्भवू शकतात.

Fssai Seizes 1780 Litre Of Reheated Cooking Oil Before Diwali Know Severe Side Effects Cancer | वापरलेल्या तेलातच पुन्हा पुन्हा तळले पदार्थ तर होऊ शकतो कॅन्सर, FSSAI चा इशारा- विकतचे पदार्थ घेताना..

वापरलेल्या तेलातच पुन्हा पुन्हा तळले पदार्थ तर होऊ शकतो कॅन्सर, FSSAI चा इशारा- विकतचे पदार्थ घेताना..

दिवाळीत मिठाई आणि गोड पदार्थांची मागणी वाढते. मागणी पूर्ण करण्यासाठी बरेच लोक खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये भेसळ करतात. इतकंच नाही तर काही बनावट पदार्थ बाजारात विकले जातात. खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं  कोयंम्बूटर जिल्ह्यातील मिठाईच्या दुकानातून १ हजार ७८० लिटर तेल जब्त केलं आहे. जे मिठाई बनवण्यासाठी वापरलं जात होतं. (Fssai Seizes 1780 Litre Of  Reheated Cooking Oil Before Diwali Know Severe Side Effects Cancer)

यावेळी टिमकडून जवळपास ३०६ किलो मिठाई जब्त करण्यात आली. यात फूड कलरचा वापर करण्यात  होता आणि १ हजार लिटरपेक्षा जास्त  रियुज्ड कुकिंग ऑईलचा समावेश होता.  तेल वारंवार गरम करून खाल्ल्यानं याच्या वापरानं गंभीर समस्या उद्भवू शकतात.

एफएसएसएआयच्या रिपोर्टनुसार  खाण्याचं तेल वारंवार गरम केल्यास ते  खाण्यायोग्य राहत नाही. सतत गरम केल्यामुळे तेलातील पोषण कमी होते. भौतिक रासायनिक गुणांवर परिणाम होतो, वारंवार तेल गरम केल्यामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात.

विंचरताना केसांचे पुंजके निघतात-खूप पातळ झाले? ५ रूपयांच्या कढीपत्त्याचा जादूई उपाय, दाट होतील केस

भारतात जास्तीत लोक खाण्यामध्ये तेलाचा वापर करतात. अनेक अभ्यासांमधून असं दिसून आलं आहे की वारंवार तेल गरम केल्यामुळे हानीकारक पदार्थ यातून निघतात. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. वारंवार गरम केल्या जाणाऱ्या तेलात अन्हेल्दी ट्रांस फॅटचे प्रमाण वाढते.

यामुळे बॅड कोलेस्टेरॉल वाढते आणि गुड कोलेस्टेरॉल कमी होते. असं तेल खाल्ल्यानं हाय ब्लड प्रेशरची समस्या उद्भवते. वारंवार वापरलेलं तेल आतड्यांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं. ज्यामुळे पचनक्रिया बिघडते, सूज येते.

मांड्या खूप जाड दिसतात-चालताना घासल्या जातात? 3 योगासनं करा, मांड्यांची चरबी होईल कमी

सतत वापरल्या जाणाऱ्या तेलांमुळे पॉलिसायक्लिक एरोमॅटीक हायड्रोकार्बन  आणि एक्रिलायमाईड तयार होते. ही दोन्ही तत्व कॅन्सरचं कारण ठरतात. सरकारनं स्वंयपाकाच्या तेलाचे उपयोग नियंत्रित करण्यासाठी काही नियम बनवले आहेत.  एका वर्षात जवळपास २३ मिनियन टन  खाद्य तेल खाल्ले जाते म्हणून एफएसएसएआय तेलाच्या वापरावर अधिक लक्ष देत आहे.

Web Title: Fssai Seizes 1780 Litre Of Reheated Cooking Oil Before Diwali Know Severe Side Effects Cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.