भारतीय स्वयंपाकघरात सर्वात जास्त वापरला जाणारा मसाला असेल तर तो हळद आहे. स्वयंपाकापासून ते शरीरावरील जखमा भरण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी हळदीचा वापर केला जातो. आजकाल रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी प्रत्येकजण हळदीच्या दुधाचं सेवन करतो. पण जर या हळदीमध्ये भेसळ झाली तर त्याचा पुरेपूर फायदा मिळत नाही. याशिवाय जखमेवरही वाईट परिणाम होऊ शकतो. याशिवाय हजारो गुणधर्मांनी भरलेली हळद, ती अनेक रोगांचे कारण बनू शकते. अशा स्थितीत, FSSAI ने नुकतीच हळदीची चाचणी करण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
FSSAI ने भेसळयुक्त सामग्री तपासण्यासाठी एक सिरिज सुरू केली आहे. ज्याचे नाव आहे #Detectingfoodadultera. यापूर्वी मालिकेत मीठ आणि हिरव्या भाज्यांमध्ये भेसळ तपासण्याचा एक सोपा मार्ग सांगितला होता. आता असाच एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे, ज्याद्वारे हळदीची शुद्धता जाणून घेता येते. हळदीची चाचणी कशी करायची ते जाणून घेऊया.
FSSAI ने व्हिडीओ शेअर करत सांगितला हळदीची गुणवत्ता तपासण्याचा मार्ग
Detecting Artificial Colour Adulteration in Turmeric#DetectingFoodAdulterants_3@MIB_India@PIB_India@mygovindia@MoHFW_INDIApic.twitter.com/eTJL1wJ9yT
— FSSAI (@fssaiindia) September 1, 2021
हळदीची शुद्धता तपासण्यासाठी तुम्हाला खाली नमूद केलेल्या फक्त 4 स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
१) एक ग्लास पाणी घ्या.
२) पाण्यात हळदीची पावडर मिसळा
३) जर हळदीमध्ये भेसळ असेल तर पाणी पिवळं होईल आणि हळद तळाशी जाऊन राहील.
४) भेसळयुक्त हळद असलेले पाणी अधिक पिवळ्या रंगाचे होईल.
हळदीचं दूध बनवण्याची योग्य पद्धत
१) एक कढई घ्या आणि त्यात थोडे तूप घाला.
२) आता त्यात हळद घाला. मंद आचेवर काही सेकंद शिजू द्या.
३) आता त्यात एक चिमूटभर काळी मिरी, जायफळ पावडर आणि दालचिनी पावडर मिसळा.
४) गॅस बंद करा आणि एक कप गरम दूध घाला आणि चवीनुसार साखर घातल्यानंतर प्या.
हळदीच्या दुधात इतर मसाले का घालायचे?
१) हळदीची पावडर कच्च्या हळदीइतकी प्रभावी नसते. कारण बाजारातील उपलब्ध हळदीची पावडर भेसळयुक्त असू शकते.
२) हळदीच्या दुधात तूप वापरल्याने हळदीचे सक्रिय संयुगे तुपात चांगले शोषले जातात आणि ते दूध पूर्णपणे पौष्टिक बनते.
३) जर तुम्ही हळदीच्या दुधात काळी मिरी घातली तर हळदीमध्ये आढळत असलेल्या कर्क्युमिनचा प्रभाव अनेक पटींनी वाढेल.