भारतीय मसाले त्यांची चव आणि आरोग्याच्या फायद्यांसाठी ओळखले जातात. मात्र, या मसाल्यांबाबत भेसळीच्या बातम्या वारंवार येत असतात. काळी मिरी हा प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात ठेवलेला एक सामान्य मसाला आहे. अन्नाची चव वाढवण्यासाठी काळी मिरी अनेक पदार्थांमध्ये वापरली जाते. पण तुम्ही वापरत असलेले काळी मिरी खरंच शुद्ध आहे की बनावट हे माहीत असणं आता गरजेचं झालंय. कारण अनेक ठिकाणी भेसळयुक्त काळीमिरी विकली जात आहे.
काळी मिरीमध्येही भेसळ होऊ शकते, याचा कोणीही विचार करू शकत नाही. पण आजकाल काळी मिरी भेसळयुक्त असल्याचा संशय आहे. जर तुम्हाला त्याच्या भेसळीची भीती वाटत असेल, तर तुम्हाला अशा काळी मिरी विकत घ्यायच्या किंवा खायच्या नसतील तर त्याची शुद्धता कशी तपासावी हे माहित असायला हवं. रोजचा डाळ भात अधिक चवदार, चविष्ट लागेल; फक्त 'या' ५ टिप्स वापरून फोडणी द्या
Detecting Blackberries Adulteration in Black Pepper#DetectingFoodAdulterants_9#AzadiKaAmritMahotsav@jagograhakjago@mygovindia@MIB_India@PIB_India@MoHFW_INDIApic.twitter.com/0hQHrLrS1z
— FSSAI (@fssaiindia) October 6, 2021
फूड सेफ्टी एंड स्टँडर्ड ऑथेरिटीनं (FSSAI) ट्विटरवर एक साधी चाचणी शेअर केली आहे. ज्यात काळी मिरीमध्ये भेसळ कशी केली जाते आणि ती कशी ओळखावी हे सांगितले आहे. त्याच्या पोस्टला मथळा होता काळी मिरीची भेसळ ओळखणे. हे दर्शवेल की आपल्या काळ्या मिरीमध्ये भेसळ झाली आहे की नाही. बहुतेक काळी मिरी ब्लॅकबेरीसह मिसळली जाऊ शकते. हे शोधण्यासाठी, FSSAI एक साधी चाचणी सुचवली आहे.
१) सगळ्यात आधी टेबलावर काळी मिरी ठेवा. आपल्या बोटाने किंवा अंगठ्याने दाबण्याचा प्रयत्न करा. काळी मिरी सहज फोडणार नाही. पण जर त्यात भेसळ असेल तर ती सहज फुटेल.
२) जेव्हा हलकी हाताने काळी मिरी फोडली जाते, तेव्हा समजून घ्या की त्यात बेरीज मिसळल्या आहेत.
३) ठेचलेले तुकडे हलक्या रंगाच्या ब्लॅकबेरीसारखे दिसतील. जे अनेकदा काळी मिरीमध्ये मिसळले जातात.
भेसळयुक्त हळद कशी ओळखायची?
FSSAI ने भेसळयुक्त सामग्री तपासण्यासाठी एक सिरिज सुरू केली. ज्याचे नाव आहे #Detectingfoodadultera. यापूर्वी मीठ आणि हिरव्या भाज्यांमध्ये भेसळ तपासण्याचा एक सोपा मार्ग सांगितला होता. ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. ज्याद्वारे हळदीची शुद्धता जाणून घेता येते.
१) एक ग्लास पाणी घ्या.
२) पाण्यात हळदीची पावडर मिसळा
३) जर हळदीमध्ये भेसळ असेल तर पाणी पिवळं होईल आणि हळद तळाशी जाऊन राहील.
४) भेसळयुक्त हळद असलेले पाणी अधिक पिवळ्या रंगाचे होईल.
Detecting Artificial Colour Adulteration in Turmeric#DetectingFoodAdulterants_3@MIB_India@PIB_India@mygovindia@MoHFW_INDIApic.twitter.com/eTJL1wJ9yT
— FSSAI (@fssaiindia) September 1, 2021