Join us  

३० सेकंदात दूध का दूध पानी का पानी: १ ट्रिक, शुद्ध अन् भेसळयुक्त दुधातील फरक लगेच कळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 11:30 AM

Testing Milk adulteration with Urea : अस्सल दूध आणि भेसळयुक्त दूधातील फरक ओळखणं कठीण होतं. रोज कळत नकळत भेसळयुक्त पदार्थांचे सेवन केले जाते. याचे तब्येतीवर गंभीर परीणाम होऊ शकतात.

सर्वच घरांमध्ये दूध आणि दुधाच्या पदार्थांचे सेवन केले जाते. रोजच्या स्वयंपाकात बऱ्याच पदार्थांमध्ये दूधाचा वापर केला जातो. दूधातून भरभरून कॅल्शियम मिळते, दूधाच्या सेवनानं हाडं चांगली राहतात. याशिवाय दिवसभर उर्जा राहण्यास मदत होते. (How to check milk adulteration or urea in milk) अनेक ठिकाणी भेसळयुक्त दूधाची विक्री केली जाते. दूधात युरीया, डीटर्जेंट, साखर, मीठ, फॉर्मेलिनसारखी रसायनं मिसळून त्याचे प्रमाण वाढवले जाते. (Testing Milk adulteration with Urea)

अस्सल दूध आणि भेसळयुक्त दूधातील फरक ओळखणं कठीण होतं. रोज कळत नकळत भेसळयुक्त पदार्थांचे सेवन केले जाते. याचे तब्येतीवर गंभीर परीणाम होऊ शकतात. फूड सेफ्टी एंण्ड स्टॅण्डर्ड्स अथोरिटी ऑफ इंडियानं (FSSAI)  दूधातील भेसळ कशी ओळखायची याबाबत अधिक माहिती दिली आहे.

युरीया एक कार्बनिक घटक आहे. याचा रंग पांढरा असतो. हा एक गंधहीन, विषारी आणि  केमिकलयुक्त पदार्थ आहे. दूधात हा पदार्थ मिसळल्यानं दूधाचा रंग बदलत नाही पण दूध घट्ट होतं. घरच्याघरीसुद्धा तुम्ही दूध भेसळयुक्त आहे की नाही याची चाचणी करू शकता. 

युरीयाचे साईड इफेक्ट्स

दूधात फॅट्सचे प्रमाण वाढवण्यासाठी युरीयाचा वापर केला जातो. या केमिकलयुक्त गंभीर नुकसान होऊ शकतं. तुमचे आतडेही खराब होऊ शकतात यामुळे पचनतंत्राला नुकसान पोहोचतं. भेसळयुक्त दूध प्यायल्यानं  तुम्हाला किडनीचे आजार, हृदयाचे आजार, कमी दिसणं, कॅन्सर असे आजार उद्भवू शकतात इतकंच नाही तर मृत्यूसुद्धा होऊ शकतो.

हाडांमध्ये जमा झालेलं युरीक ॲसिड बाहेर काढेल १ पदार्थ: नियमित खा, किडनी स्टोनही टळेल

दुधातील भेसळ कशी तपासावी?

१) एका टेस्ट ट्यूब मध्ये एक चमचा दूध घाला किंवा टेस्ट ट्यूब उपलब्ध नसल्यास काचेची वाटी किंवा ग्लास घेऊ शकता. 

२) यात अर्धा चमचा सोयाबीन किंवा तूरीची डाळ घाला.

३) हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा

४) ५ मिनिटानंतर टेस्ट ट्यूबमध्ये लाल लिटमस पेपर घाला.

५) अर्ध्या मिनिटानंतर पेपर बाहेर काढून घ्या.

६) लाल लिटमस पेपरचा रंग बदलला असेल म्हणजेच रंग नीळा झाला असेल तर समजून जा की दूधात युरीया मिसळेला आहे.

दूधातील भेसळयुक्त पदार्थांमुळे काय परीणाम होतो?

मेलामाईन या घटकामुळे किडनीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, फॉर्मेलिन दूधाची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात आणि कॅन्सरचा धोका उद्भवतो.  डिटर्जेंटमुळे आतड्या आणि किडनीच्या समस्या उद्भवू शकतात. स्टार्चमुळे डायबिटीसचा धोका जास्त असतो. हायड्रोजन पेरोक्साईडमुळे पचनतंत्राला नुकसान पोहोचू शकतं. 

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.