दूध पिणं आपल्या आरोग्यासाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरते. दूधात अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे शरीराचे कार्य चांगले होण्यास मदत होते. (Home Hacks) दुधातील पोषक तत्वांबद्दल बोलायचे झाले तर यात प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटामीन डी, व्हिटामीन ए, पोटॅशिम, मॅग्नेशियम असते. रोज दूध प्यायल्याने हाडं आणि दातं मजबूत होण्यास मदत होते. इम्यून सिस्टीम चांगली राहते. (FSSAI told the trick to detect adulteration in milk Home)
पचनक्रिया चांगली राहते. वजन कमी करण्यासाठी, हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी, त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्या, झोपेची गुणवत्ता सुधारण्यासही मदत होते. दूधात अनेक पोषक तत्व आणि दूधाच्या सेवनाने अनेक फायदे मिळतात. अनेकजण दूध समजून भेसळयुक्त पाणी पितात घरात जे दूध येतं त्यात भेसळ असू शकते.
दूधात पाण्याची भेसळ का केली जाते
व्यापारी अनेकदा जास्त नफा मिळवण्यासाठी दूधात पाणी मिसळून विकतात. फक्त पाणी मिसळ्याने त्यांचे काम होत नाही तर दूध घट्ट होण्यासाठी ते त्यात युरीया, अरारोट , अमोनिया, नायट्रेट फर्टिललायजर, शुगर, मीठ, ग्लुकोज यांसारखे धोकादायक केमिकल्स मिसळतात. जे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतात.
दूधातील भेसळ तब्येतीसाठी नुकसानकारक
दूधाचे रोज सेवन करता येते पण दूधाची विक्री करणारे लोक चुकीच्या पद्धतीने फायदा मिळवण्यासाठी त्यात पाणी मिसळून दूध विकतात. ज्यामुळे दूध केमिकलयुक्त होते. भेसळयुक्त दूध प्यायल्याने अनेक गंभीर आजारही उद्भवू शकतात. हृदयाशी संबंधित समस्या, कॅन्सर, डोळ्यांना कमी दिसणं, किडणी खराब होणं अशा समस्या उद्भवतात.
किचन सिंक वारंवार तुंबतं, पाणी साठतं? १ ट्रिक वापरा, सिंकमध्ये तुंबलेल्या पाण्याचा होईल निचर
तुम्हीसुद्धा घरी आणत असलेल्या दुधाबाबत चिंतेत असाल तर काही सोपे उपाय करून तुम्ही दूधाची गुणवत्ता तपासू शकता. सगळ्यात आधी काचेचा एक लांब तुकडा घ्या आणि खाली पकडा, त्यावर दूधाचे काही थेंब घाला. जर दूध अस्सल असेल तर त्यातून हळूहळू वाहील आणि मागे पांढरे डाग सोडेल. पण दूधात पाणी मिसळलेलं असेल तर त्याचे कोणतेही डाग दिसणार नाहीत.