कच्चे अन्नपदार्थ (Food-borne illnesses) शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतात असं अनेकांकडून तुम्ही ऐकलं असेल. तुमचा विश्वास बसणार नाही पण शिजवलेलं अन्न व्यवस्थित साठवून ठेवलं नाही तर अनेक आजारांचे कारण ठरू शकते. हाच धोका लक्षात घेत भारत सरकारकडून खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India FSSAI)नं सोशल मीडियावर खाद्य सुरक्षा आणि पोषणाबाबत महत्वाची माहिती शेअर केली आहे. FSSAI ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून कच्च्या आणि शिजवलेल्या अन्नपदार्थांबाबत माहिती दिली आहे. याशिवाय लोकांच्या मनातील काही गैरसमजही दूर केले आहेत.
शिजवलेल्या अन्नामार्फतही पसरू शकतात आजार
एफएसएसएआयच्या मते, शिजवलेल्या अन्नामार्फत कोणतेही आजार पसरू शकत नाहीत हा एक गैरसमज आहे. याशिवाय शिजवलेलं अन्न रुम टेंमरेचरवर ठेवलं जाऊ शकतं असंही लोकांना वाटतं. सरकारनं जाहिर केलेल्या माहितीनुसाार दोन्ही प्रकारच्या फूड आयट्म्समुळे आजार पसरण्याचा धोका जास्त असतो. अशा स्थितीत अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काही गोष्टींबाबत सावधगिरी बाळगायला हवी.
शिजवलेलं अन्न कधी ठरू शकतं नुकसानकारक
FSSAI नं दिलेल्या माहितीनुसार असे अनेक प्रकार आहेत. ज्याद्वारे तयार केलेलं अन्न दूषित होऊ शकतं आणि त्यामुळे शरीराला नुकसान पोहोचतं. जाणून घ्या असं कधी होऊ शकतं.
१) जेव्हा घरात तयार केलेलं अन्न व्यवस्थित साठवलं जात नाही तेव्हा त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून जेवण झाल्यानंतर उरलेलं अन्न ५ डिग्री सेल्सियसवर कमीत कमी २ तासांसाठी रेफ्रिजरेट करायला हवं.
२) शिजवलेलं अन्न असुरक्षित अशावेळी होतं जेव्हा ते योग्य ठिकाणी साठवून ठेवलं जात नाही. म्हणजेच अस्वच्छ ठिकाणी जर तुम्ही एखादा पदार्थ ठेवला तर तो दुषित होऊ शकतो.
३) जर जेवण नॉन फूड ग्रेड भांड्यांमध्ये ठेवले तर ते खाण्यायोग्य नसते.
४) घरात किंवा हॉटेलमध्ये जेव्हा जेवण बनवणारी व्यक्ती वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देत नाही तेव्हा अन्न दूषित होऊ शकते.
५) कच्च्या अन्नासह साठवून ठेवल्यास ते अन्न खाण्यायोग्य नसते.
जेवण कसं सुरक्षित ठेवायचं?
१) आजारांपासून बचावासाठी जेवण बनवण्याआधी आणि नंतर हात स्वच्छ धुवायला हवेत. बाहेरचं खाणं टाळावं
२) सर्व अन्न पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवायला हवेत.
३) जेवण बनवण्याआधी आणि नंतर स्वयंपाक घर व्यवस्थित स्वच्छ करावं.
४) कच्च्या पदार्थांचे सेवन करू नये. त्यातील हानीकारक बॅक्टेरिया पोटासाठी नुकसानकारक ठरू शकतात.पोषण तज्ज्ञ नमामी अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार फूड पॉइजनिंगपासून बचाव करण्यासाठी योग्य पद्धतीनं शिजलेलं, ताजं अन्न खायला हवं. जेवणा आधी आणि नंतर बाजारातून काही विकत घेत असाल तर व्यवस्थित धुवून घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही फूलगोभी, पालक, ब्रोकोली या भाज्या मीठाच्या पाण्यानं धुतल्यानंतरच वापरा.