अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मिडियावर खूप ॲक्टीव्ह असते हे तर आपल्याला माहितीच आहे. पण तिचे पती डॉ. श्रीराम नेनेही सोशल मिडियावर खूप ॲक्टीव्ह असतात. आता पेशाने ते डाॅक्टर असल्याने सर्वसामान्यांना उपयुक्त ठरणाऱ्या हेल्थ टिप्स ते नेहमीच सोशल मिडियावर शेअर करत असतात. आता हिवाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे घरोघरी एक गोड पदार्थ हमखास तयार केला जातो आणि तो म्हणजे गाजराचा हलवा. गाजराचा हलवा अनेकांना आवडतो, पण त्यात साखर असल्याने अनेक जण तो खाणं टाळतात (how to make gajar ka halva without adding sugar?). म्हणूनच साखर न टाकताही अतिशय चवदार गाजर हलवा कसा तयार करायचा याची रेसिपी डॉ. नेनेंनी सोशल मिडियावर शेअर केली आहे.(Gajar Ka Halva Recipe By Dr. Shriram Nene)
साखर न घालता गाजराचा हलवा कसा करावा?
साहित्य
पाव किलो गाजर
२ ते ३ टेबलस्पून तूप
२ टेबलस्पून काजुची पेस्ट
केळी खाल्ल्याने खरंच रक्तातील साखर, वजन वाढते? मधुमेह असणाऱ्यांनी केळी खाणं कितपत योग्य?
१ ते २ टीस्पून वेलची पावडर
१ कप बदामाचं दूध
१ टेबलस्पून बदाम
१ टेबलस्पून काजू
१ टेबलस्पून मनुका
कृती
सगळ्यात आधी तर गाजर स्वच्छ धुवून घ्या आणि ते व्यवस्थित किसून घ्या.
त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये तूप घाला. तूप तापलं की त्यामध्ये किसलेलं गाजर टाका आणि ७ ते ८ मिनिटांसाठी मध्यम आचेवर व्यवस्थित परतून घ्या.
तारुण्य हवं तर साखर सोडा! एक्सपर्ट सांगतात-साखरेचे खाणार त्याला लवकर म्हातारपण येणार!
त्यानंतर त्यामध्ये १ ते दिड कप बदामाचं दूध आणि काजू पेस्ट घाला. त्याचवेळी दुसऱ्या गॅसवर एक लहान कढई गरम करायला ठेवा आणि त्यात तूप घालून काजू, बदाम, मनुका परतून घ्या.
हलवा थोडा आळून आला की त्यामध्ये वेलची पावडर आणि परतून घेतलेला सुकामेवा घाला. डॉ. नेनेंच्या पद्धतीचा गाजर हलवा झाला तयार..
डॉ. नेने सांगतात की काजुची पेस्ट, बदामाचे दूध आणि मनुका हे पदार्थ त्या हलव्यामध्ये गोडवा आणतात. त्यामुळे साखर टाकण्याची गरजच राहात नाही.