हिवाळा म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्यांचे बाजारात मुबलक प्रमाणात आगमन झालेले असते. त्याच्या जोडीला गाजर- मुळा- आवळा यांचीही रेलचेल असतेच. शिवाय इतर कोणत्याही ऋतुपेक्षा या दिवसांत मिळणाऱ्या भाज्या अधिक फ्रेश आणि स्वस्तही असतात. त्यामुळे खवय्यांची या दिवसांत खऱ्या अर्थाने मजा असते. आता सध्या बाजारात गाजर- मुळा भरपूर प्रमाणात आलेच आहेत, तर त्यांचं हे चटपटीत लोणचं घालून टाका. ताजं ताजं इन्स्टंट लोणचं (Gajar- Muli instant achar recipe) चवीला अगदी उत्तम असतं. काही जणांना नुसता मुळा खायला आवडत नाही. त्यांना या लोणच्यातला चटपटीत मुळा नक्कीच आवडेल आणि शिवाय मुळ्यातल्या पौष्टिक पदार्थांचा लाभही आरोग्याला होईल.(carrot and radish pickle)
गाजर- मुळा लोणचं रेसिपी
साहित्य
१ वाटी उभे काप करून चिरलेला मुळा
२ वाट्या उभे काप करून चिरलेले गाजर
२ टीस्पून बडिशेप
वयाच्या ६३ व्या वर्षी नीना गुप्ता करतेय जबरदस्त व्यायाम.. बघा व्हायरल व्हिडिओ
१ टेबलस्पून मोहरी
चवीनुसार मीठ आणि लाल तिखट
पाव टीस्पून हळद
पाऊण टीस्पून आमचूर पावडर
चिमुटभर हिंग आणि ३ टेबलस्पून तेल
कृती
१. सगळ्यात आधी गाजराचे आणि मुळ्याचे उभे काप करून घ्या.
२. मसाल्यासाठी बडिशेप आणि मोहरी भाजून घ्या, थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करून घ्या.
फक्त १० रुपयांत घरच्याघरी करा नॅचरल ब्लीच, काळवंडलेला चेहरा होईल फ्रेश- तुकतुकीत
३. आता एका बाऊलमध्ये चिरलेले गाजर, मुळा, बडिशेप- मोहरीचा मसाला, आमचूर पावडर, हिंग, चवीनुसार तिखट मीठ टाकून घ्या.
४. सगळ्यात शेवटी गरम करून थंड केलेलं तेल टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलं की गाजर- मुळा लोणचं झालं तयार.
आणखी एक सोपी रेसिपी
१. गाजर आणि मुळ्याचे काप करून घ्या. त्यात बाजारात विकत मिळणारा लोणचं मसाला टाका.
२. आमचूर पावडर नसल्यास एका लिंबाचा रस टाका आणि चिमुटभर साखर टाका.
३. चवीनुसार तिखट- मीठ टाका.
४. छोट्याशा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा आणि त्यात जिरे, मोहरी, हिंग टाकून फोडणी करून घ्या.
५. फोडणीचं तेल थंड झालं की लोणच्यात टाका. सगळं लोणचं व्यवस्थित हलवून घ्या. चवदार लोणचं तयार.