Lokmat Sakhi >Food > हिवाळा स्पेशल : लालचुटूक गाजरांची वडी केली की नाही? सोपी रेसिपी, तोंडात टाकताच विरघळणारी वडी तयार

हिवाळा स्पेशल : लालचुटूक गाजरांची वडी केली की नाही? सोपी रेसिपी, तोंडात टाकताच विरघळणारी वडी तयार

Gajar Vadi Carrot Barfi Easy Recipe Winter Special Food : गाजराची वडी झटपट आणि परफेक्ट होण्यासाठी नेमकं काय करायचं पाहूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2022 12:27 PM2022-11-30T12:27:50+5:302022-11-30T14:12:46+5:30

Gajar Vadi Carrot Barfi Easy Recipe Winter Special Food : गाजराची वडी झटपट आणि परफेक्ट होण्यासाठी नेमकं काय करायचं पाहूया...

Gajar Vadi Carrot Barfi Easy Recipe Winter Special : Easy recipe of Gajar Carrot Vadi Barfi that melts in your mouth | हिवाळा स्पेशल : लालचुटूक गाजरांची वडी केली की नाही? सोपी रेसिपी, तोंडात टाकताच विरघळणारी वडी तयार

हिवाळा स्पेशल : लालचुटूक गाजरांची वडी केली की नाही? सोपी रेसिपी, तोंडात टाकताच विरघळणारी वडी तयार

Highlightsबाजारात लालचुटूक गाजर दिसायला लागले की घरोघरी हलवा होतोच, त्यालाच एक छान पर्यायझटपट होणारी आणि घरातील सगळ्यांना आवडेल अशी गाजराची हेल्दी रेसिपी

थंडीच्या दिवसांत बाजारात आवर्जून दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे गाजर, मटार. मग या गोष्टींपासून लोणचं, हलवा आणि आणखी काहीबाही पदार्थ आपण आवर्जून करतो. थंडीच्या दिवसांत एकूणच बाजारात फ्रेश आणि भरपूर भाज्या मिळतात. त्यातच आपल्याला एरवीपेक्षा जास्त भूक लागत असल्याने आणि शरीराला ऊर्जेची आवश्यकता असल्याने आपण भरपूर आणि पौष्टीक काही ना काही खात असतो. लालचुटूक गाजर अनेकांच्या आवडीचे असल्याने या काळात आपण आवर्जून गाजराचा हलवा करतो. नेहमी हलवा करुन कंटाळा आला असेल आणि जाता येता तोंडात टाकता येईल असे काही करायचे असेल तर गाजराची वडी हा उत्तम पर्याय आहे. काहीवेळा आपण ही व़डी ट्रायही केली असेल पण कधी ती खूप कडक होते तर कधी जास्त मऊ झाल्याने त्याच्या वड्याच पडत नाहीत. म्हणूनच गाजराची वडी झटपट आणि परफेक्ट होण्यासाठी नेमकं काय करायचं पाहूया (Gajar Vadi Carrot Barfi Easy Recipe Winter Special Food)

(Image : Google)
(Image : Google)

साहित्य - 

१. तूप - १ चमचा 

२. गाजर - ३ कप

३. खवा किंवा मिल्क पावडर - १ कप 

४. साखर - १ कप

५. खोबऱ्याचा किस - १ कप

६. बदाम, काजू, पिस्ते - प्रत्येकी ७ ते ८ 

७. वेलची पूड - अर्धा चमचा 

कृती -

१. गाजर स्वच्छ धुवून किसून घ्यावे.

२. कढईत तूप घालून त्यामध्ये किसलेले गाजर घालून ते ५ मिनीटे चांगले परतून घ्यायचे.

३. चांगलं परतून झाले की त्यामध्ये साखर आणि खवा किंवा मिल्क पावडर घालायचे.

४. यामध्ये बदाम आणि काजूचे काप घालून हे मिश्रण घट्ट होईपर्यंत चांगले ८ ते १० मिनीटे परतून घ्यायचे. 

५. मिश्रण घट्टसर व्हायला लागले की त्यामध्ये बारीक किसलेले खोबरे घाला. यामुळे ओलसरपणा कमी होऊन घट्टपणा येण्यास मदत होते आणि वड्यांना छान फ्लेवर येतो. खोबरं आवडत नसेल तर नाही घातले तरी चालते. 

६. आणखी घट्टसर होईपर्यंत चांगले परतून घ्यावे. खोबरं नसेल घातलं तर दाटसरपणा यायला थोडा वेळ लागेल. 

७. यामध्ये वेलची पूड घालून सगळे छान एकजीव करायचे.

८. मिश्रण एका ताटात सेट करुन त्यावर सुकामेवा घालून ३ ते ४ तास हे ताट गार होण्यासाठी ठेवावे आणि नंतर वड्या कापून त्या खायला घ्याव्यात.

Web Title: Gajar Vadi Carrot Barfi Easy Recipe Winter Special : Easy recipe of Gajar Carrot Vadi Barfi that melts in your mouth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.