Lokmat Sakhi >Food > गणेशउत्सव 2024: खोबऱ्याची खिरापत करण्याची एकदम सोपी रेसिपी; १० मिनिटांत गणपतीच्या आवडीचा नैवेद्य तयार

गणेशउत्सव 2024: खोबऱ्याची खिरापत करण्याची एकदम सोपी रेसिपी; १० मिनिटांत गणपतीच्या आवडीचा नैवेद्य तयार

Ganapati Festival 2024: गणपतीच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे सुक्या खोबऱ्याची खिरापत. बघा त्याची एकदम सोपी रेसिपी. (how to make khirapat for Ganesh festival?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2024 05:33 PM2024-09-02T17:33:04+5:302024-09-02T17:33:53+5:30

Ganapati Festival 2024: गणपतीच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे सुक्या खोबऱ्याची खिरापत. बघा त्याची एकदम सोपी रेसिपी. (how to make khirapat for Ganesh festival?)

Ganapati Festival 2024, how to make khirapat for Ganesh festival, khobaryachi khirapat recipe for ganpati naivedya,   | गणेशउत्सव 2024: खोबऱ्याची खिरापत करण्याची एकदम सोपी रेसिपी; १० मिनिटांत गणपतीच्या आवडीचा नैवेद्य तयार

गणेशउत्सव 2024: खोबऱ्याची खिरापत करण्याची एकदम सोपी रेसिपी; १० मिनिटांत गणपतीच्या आवडीचा नैवेद्य तयार

Highlights आता बऱ्याच ठिकाणी पिठीसाखरेच्याऐवजी गुळाची पावडरही टाकली जाते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे बदल करू शकता.

बहुतांश लोकांचा आवडीचा सण म्हणजे गणेशोत्सव. या दहा दिवसात गणपती आपल्या घरी विराजमान होतात आणि सगळं घर आनंदात उत्साहात नाहून निघतं. (Ganesh festival 2024). गणपतीच्या आगमनासाठी आपण आपल्या परीने जमेल तशी सगळी तयारी करून ठेवतो. त्याच्या आवडीचे नैवेद्याचे पदार्थही आवर्जून करतो. त्या पदार्थांमधला एक मानाचा पदार्थ म्हणजे खोबऱ्याची खिरापत. बघा खोबऱ्याची खिरापत करण्याची एक सोपी रेसिपी. (How to make khobaryachi khirapat for Ganpati)

खोबऱ्याची खिरापत करण्याची रेसिपी 

 

साहित्य 

१ वाटी खोबऱ्याचा कीस

अर्धी वाटी पिठीसाखर

२ ते ३ चमचे खसखस

किचनमधले २ पदार्थ नियमित वापरा; डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन जातील- चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

२ चमचे चारोळी 

१ चमचा काजू, बदामाचे तुकडे 

१ ते २ टीस्पून वेलची पूड 

 

कृती 

सगळ्यात आधी खोबरं किसून घ्या आणि ते मंद आचेवर सोनेरी रंगाचे होईपर्यंत खरपूस भाजून घ्या. 

यानंतर खसखस थोडीशी भाजून घ्या. अगदी अर्धा ते पाऊण मिनिट मंद आचेवर भाजा. अन्यथा ती करपू शकते. 

यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण- लाईटिंगचे कलश, मोदक आणि तोरण- घरबसल्या करा झटपट खरेदी

आता एका भांड्यात खोबऱ्याचा भाजून घेतलेला किस हातानेच थोडा कुस्करून घ्या. खलबत्त्यात खसखस कुटून घ्या.

यानंतर कुटलेली खसखस, पिठीसाखर, काजू व बदामाचे तुकडे आणि वेलची पूड असं सगळं एकत्र करा आणि व्यवस्थित हलवून घ्या. खोबऱ्याची खिरापत झाली तयार.

वेलची पूड ऐवजी तुम्ही जायफळही टाकू शकता. तसेच आता बऱ्याच ठिकाणी पिठीसाखरेच्याऐवजी गुळाची पावडरही टाकली जाते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे बदल करू शकता.

 

Web Title: Ganapati Festival 2024, how to make khirapat for Ganesh festival, khobaryachi khirapat recipe for ganpati naivedya,  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.