गणपती बाप्पांचे आता लवकरच आगमन होणार आणि ते १० दिवस मोठ्या आनंदात आपल्या घरी विराजमान होणार. या दहा दिवसात दहा वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य गणपतीसाठी करण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो (banana modak recipe). म्हणूनच तुमच्या दहा पदार्थांच्या यादीमध्ये केळीचे मोदकही लिहून ठेवा (How To Make Keliche Modak?). या पदार्थाला काही ठिकाणी केळीचे अप्पे, केळीचे वडे तर काही ठिकाणी मुकुलू असेही म्हणतात. बघा केळीचे मोदक करण्याची सोपी रेसिपी...(keliche modak recipe in Marathi)
केळीचे मोदक करण्याची रेसिपी
केळीचे मोदक करण्याची रेसिपी शेफ स्मिता देव यांनी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे..
साहित्य
२ मध्यम आकाराची केळी
बेसन कच्चं राहून लाडू टाळूला चिकटतो? घरीच करा बेसन- घ्या खमंग लाडूंची सोपी रेसिपी
१ वाटी साखर
१ टीस्पून वेलची पूड
२ वाट्या रवा
तळण्यासाठी तूप
कृती
१. सगळ्यात आधी केळी एका भांड्यात घ्या आणि ती व्यवस्थित बारीक करून घ्या.
२. कुस्करलेल्या केळीमध्ये साखर टाका आणि पुन्हा एकदा साखर आणि केळी एकत्र करून घ्या.
१५ मिनिटांत करा चवदार मखाना खीर, हरितालिकेच्या उपवासाचा थकवा येणार नाही- घ्या सोपी रेसिपी
३. आता साखर- केळीच्या मिश्रणात रवा आणि वेलची पूड घाला आणि सगळे पदार्थ छान एकजीव करून घ्या.
४. त्यानंतर त्याचे छोट्या छोट्या आकाराचे मोदक करा आणि मोदक केल्यावर लगेच ते कढईतल्या तुपात टाकून तळून घ्या.
५. मोदक बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ व्हावेत यासाठी मोदक तुपात तळायला सोडत असताना गॅसची फ्लेम मोठी करा आणि एकदा सगळे मोदक तुपात सोडून झाले की गॅस मध्यम आचेवर ठेवा.
६. काही ठिकाणी या मोदकांमध्ये खोवलेलं नारळ आणि साखरेऐवजी गूळ टाकला जातो.