Join us  

Ganesh chaturthi 2021 : ....म्हणून गणपती बाप्पाला सगळ्यात जास्त मोदकच आवडतात; जाणून घ्या 'ही' ५ कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2021 12:25 PM

Ganesh chaturthi 2021 : काजू मोदक, उकडीचे मोदक, मोतीचूर मोदक, माव्याचे मोदक, लाल गव्हाचे मोदक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य गणपतीच्या दिवसात बाप्पासाठी तयार केला जातो. पण गणपतीला मोदक इतके का आवडतात तुम्हाला माहित आहे का?

ठळक मुद्देमोदक मऊ असतात आणि त्यांना चावण्याची गरज नसते. म्हणूनच भूक लागल्यानंतर गणेशजींनी मोदक खाल्ले. तेव्हापासून मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ बनला आहे. गणपतीला विघ्नहर्ता असेही म्हणतात. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी भक्त मोदक अर्थात आनंदही देतात.

गणपतीची पूजा आणि मोदक नसणार असं कधीच पाहायला मिळत नाही. आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की गणपती बाप्पाला मोदक प्रचंड आवडतात. बाप्पाला अनेक प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दिला जातो. पण जिथं बाप्पा तिथं मोदक हे समीकरण नेहमीच ठरलेलं असतं. काजू मोदक, उकडीचे मोदक, मोतीचूर मोदक, माव्याचे मोदक, लाल गव्हाचे मोदक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य गणपतीच्या दिवसात बाप्पासाठी तयार केला जातो. पण गणपतीला मोदक इतके का आवडतात तुम्हाला माहित आहे का? मोदकांच्या नैवेद्यामागे खास कारणही आहे.

पहिलं कारण

लोकप्रिय आख्यायिकेनुसार, एकदा भगवान शिव झोपले होते आणि भगवान गणेश दरवाज्यावर पहारा देत होते. जेव्हा परशुराम तिथे पोहचला तेव्हा गणपतीनं त्याला दारात थांबवले. परशुराम रागावून गणपतीशी भांडू लागला. या युद्धात शिवाने दिलेल्या परशुने परशुरामाने गणेशावर हल्ला केला. ज्यामुळे यामुळे गणपतीचा एक दात तुटला. जेव्हा दात तुटल्यामुळे गणपतीला अन्न चावण्यास त्रास होऊ लागला, तेव्हा त्याच्यासाठी मोदक तयार केले गेले. मोदक मऊ असतात आणि त्यांना चावण्याची गरज नसते. म्हणूनच भूक लागल्यानंतर गणेशजींनी मोदक खाल्ले. तेव्हापासून मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ बनला आहे.

दुसरं कारण

ही कथा गणेश जी आणि आई अनुसया यांच्याशी संबंधित आहे. एकदा गणपती माता पार्वती आणि भगवान शिव यांच्यासह अनुसया यांच्या घरी गेले. आई अनुसयाने विचार केला की प्रथम गणपतीला जेवण  द्यावे. जेवण वाढल्यानंतरही गणपतीची भूक संपत नव्हती. अनुसयाने विचार केला की जर मी काहीतरी गोड खाऊ घातले तर कदाचित गणपतीचे पोट भरेल. त्यावेळी त्यांनी गणपतीला मोदक खायला घातले. त्यानंतर लगेचच गणपतीचं पोट भरलं आणि मोठा ढेकर घेतला.

तिसरं कारण

असे मानले जाते की जर गणपतीला 21 मोदक अर्पण केले गेले तर त्यांच्याबरोबर इतर सर्व देवतांचेही पोट भरले जाते. याच कारणामुळे नैवे्द्यात गणपतीला मोदक अर्पण केला जातो. जेणेकरून त्याच्याबरोबर इतर सर्व देवतांचे आशीर्वादही मिळू शकतील.

चौथे कारण

जर आपण शब्दांकडे पाहिले तर मोद म्हणजे आनंद. गणपती नेहमी आनंदी असतात आणि त्यांच्या भक्तांचे दुःख दूर करतात आणि त्यांच्या जीवनात आनंद आणतात. म्हणूनच गणपतीला विघ्नहर्ता असेही म्हणतात. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी भक्त मोदक अर्थात आनंदही देतात.

पाचवं कारण

मोदक हे अमृतापासून बनवल्याचे सांगितले जाते. देवतांनी पार्वतीला दिव्य मोदक दिले. जेव्हा गणेशाला अमृतापासून बनवलेल्या दिव्य मोदकांबद्दल कळले तेव्हा त्याला ते खाण्याची इच्छा वाटली. आई पार्वतीकडून मिळाल्यानंतर त्याने मोदक खाल्ले आणि तेव्हापासून गणपती मोदकांच्या प्रेमात आहेत. 

टॅग्स :गणेशोत्सवअन्नगणेशोत्सव