Lokmat Sakhi >Food > उकडीच्या मोदकांची पारी फुटते? न लाटता- न वळता करा मोदकाची ‘अशी’ परफेक्ट पारी

उकडीच्या मोदकांची पारी फुटते? न लाटता- न वळता करा मोदकाची ‘अशी’ परफेक्ट पारी

Ganesh Chaturthi 2023 : बाकीचा स्वंयपाक अगदी पटकन होतो पण उकडीचे मोदक करायला मात्र वेळ लागतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 11:17 AM2023-09-12T11:17:14+5:302023-09-14T12:30:16+5:30

Ganesh Chaturthi 2023 : बाकीचा स्वंयपाक अगदी पटकन होतो पण उकडीचे मोदक करायला मात्र वेळ लागतो.

Ganesh Chaturthi 2023 : How to Make Perfect Ukadiche Modak for Ganesh Chaturthi | उकडीच्या मोदकांची पारी फुटते? न लाटता- न वळता करा मोदकाची ‘अशी’ परफेक्ट पारी

उकडीच्या मोदकांची पारी फुटते? न लाटता- न वळता करा मोदकाची ‘अशी’ परफेक्ट पारी

गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2023) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. गणेशोत्सव म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतात ते म्हणजे मोदक. मोदकांशिवाय गणेशोत्सव पूर्णच होत नाही. घरात गणपती बाप्पांचे आगमन होताच नैवेद्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवायला सुरूवात होते. (Ganesh Chaturthi 2023) उकडीचे मोदक सर्वांनाच खायला आवडतात.

बाकीचा स्वंयपाक अगदी पटकन होतो पण उकडीचे मोदक करायला मात्र वेळ लागतो. कारण हे मोदक बनवणं थोडं किचकट काम, सर्वांनाच मोदक करायला जमतात असं नाही. काहीवेळा मोदक फुटतो तर अनेकदा मोदकाची पारी कडक होते तर कधी जास्त सैल होते. परफेक्ट मोदकाची पारी बनवण्याची सोपी पद्धत पाहूया. (How to Make Perfect Ukadiche Modak for Ganesh Chaturthi)

1) मोदकाचं पीठ व्यवस्थित मळून घेतल्यानंतर एक लहान गोळा तोडून घ्या. हा गोळा हाताने मऊ करून नंतर एका प्लास्टीच्या कागदावर ठेवा. प्लास्टिकच्या कागदावर ठेवल्यानंतर वरून सुद्धा प्लास्टिकचा पेपर घाला. त्यानंतर एका छोट्या प्लेटच्या साहाय्याने हा गोळा चपटा करून घ्या. 

टपरीसारखा चहा घरी करण्याचं 'सोपं सिक्रेट'; कडक-जाडसर चहा, एक घोट घेताच मन होईल तृप्त

2) तुम्हाला हवा तेव्हढा चपटा गोळा तुम्ही करू शकता. नंतर हे पसरवलेलं पीठ  हातावर घेऊन त्याच्या कळ्या पाडा. हाताने सर्व कळ्या एकत्र करून मोदकाला सुबक आकार द्या.  मोदक वळताना तुपाचा हात लावायला विसरू नका.

उकडीचे मोदक बिघडू नयेत यासाठी टिप्स

१) मोदकाचे सारण तयार करताना कढईत तूप घालून त्यात खोवलेलं नारळ, साखर आणि गूळ घालून मंद आचेवर परतवा.  सारण शिजलं की त्यात खसखस, वेलची पावडर घाला. सारण एकजीव न केल्यास मोदक फुटण्याची शक्यता असते. 

नैवेद्य दाखवायचाय, वेळ कमी आहे? १० मिनिटांत घरीच करा रबडीसारखी खीर; पटकन बनेल नैवेद्य

२) मोदकाचं बाहेरील आवरण करण्यासाठी तांदळाचं पीठ आणि पाणी याचं मिश्रण व्यवस्थित ठेवा. हे  दोन्ही पदार्थ एकत्र करून त्यात मीठ, तूप आणि तेल घाला. पाणी उकळ्यानंतर पीठ हलवून घ्या. झाकण ठेवून चांगली वाफ काढून घ्या. वाफ काढून घेतली नाही तर मोदक फुटतात. पीठ जितकं छान मळाल तिचे मोदक चांगले बनतील. 

Web Title: Ganesh Chaturthi 2023 : How to Make Perfect Ukadiche Modak for Ganesh Chaturthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.