Lokmat Sakhi >Food > तांदुळाच्या पिठीत मिसळा १ गोष्ट, एकही मोदक फुटणार नाही सुबक-कळीदार मोदकांची खास पद्धत

तांदुळाच्या पिठीत मिसळा १ गोष्ट, एकही मोदक फुटणार नाही सुबक-कळीदार मोदकांची खास पद्धत

(Ganesh Chaturthi 2023 : तांदळाचे मोदक फुटतात तर कधी सारण पातळ होतो असं खूपदा होतं. यामुळे मोदक बिघडतात. मऊ, सुबक बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (Ukadiche modak Recipe)

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 12:39 PM2023-09-18T12:39:39+5:302023-09-19T02:55:53+5:30

(Ganesh Chaturthi 2023 : तांदळाचे मोदक फुटतात तर कधी सारण पातळ होतो असं खूपदा होतं. यामुळे मोदक बिघडतात. मऊ, सुबक बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (Ukadiche modak Recipe)

Ganesh Chaturthi 2023 Special : Modak Recipe How to Make Perfect Modak | तांदुळाच्या पिठीत मिसळा १ गोष्ट, एकही मोदक फुटणार नाही सुबक-कळीदार मोदकांची खास पद्धत

तांदुळाच्या पिठीत मिसळा १ गोष्ट, एकही मोदक फुटणार नाही सुबक-कळीदार मोदकांची खास पद्धत

गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2023) म्हटला की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतात ते म्हणजे मोदक. गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी घरोघरी उकडीचे मोदक केले जातात. पण मोदक बनवणं वाटतं तितकं सोपं नाही. तांदळाचे मोदक फुटतात तर कधी सारण पातळ होतो असं खूपदा होतं. (Modak Recipe) यामुळे मोदक बिघडतात. (Ukadiche Modak)मऊ, सुबक बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. तांदळाच्या पिठात जर तुम्ही स्वंयपाकघरातला एक पदार्थ मिसळला तर मोदक अजिबात बिघडणार नाही. (How to Make Perfect Modak)

मोदकाच्या पीठातील सिक्रेट पदार्थ कोणता?

१) भाकरीसाठी किंवा भातासाठी जे तांदूळ वापरतो तेच तुम्ही मोदकांसाठी वापरू शकता. फक्त ते व्यवस्थित धुवून घ्या. त्यानंतर व्यवस्थित वाळवून घ्या.  १ किलो तांदळात १ वाटी साबुदाणे मिसळा. साबुदाण्यामुळे पीठाला चिकटपणा येतो. 

२) जेव्हा आपण मोदक उकडून घेतो तेव्हा ते अगदी मऊ लुसलुशीत होतात. जर तुम्ही साबुदाणे  बाहेरून दळून आणू शकत नसाल तर मिक्सरच्या भांड्यात बारीक करून तांदळाच्या पिठात घाला. मोदक करण्याआधी पीठ  चाळून घ्या. 

मोदकाचं सारण

मोदकाचं सारण करण्यासाठी गॅसवर कढई ठेवून एक चमचा तुपात खोबऱ्याचा कीस घाला. त्यात १ वाटी चिरलेला गूळ घाला. गूळ मंद आचेवर एकजीव होईपर्यंत परतत राहा. यात चवीसाठी १ चिमुट मीठ घाला. गॅस बंद करून त्यात वेलची आणि जायफळ पावडर घाला. मोदकाचं सारण तयार आहे.

मोदकाच्या आवरणासाठी पीठ तयार करण्याची योग्य पद्धत

उकड काढताना एक कप पीठासाठी एक कप पाणी लागेल. त्यात चवीप्रमाणे मीठ आणि १ चमचा साजूक तूप घाला. पाण्याला उकळ येण्यासाठी झाकण ठेवा. उकळ आल्यानंतर एकत्र केलेलं तांदळाचे आणि साबुदाण्याचे पीठ पाण्यात घाला. पाणी  गरम  असतानाच चमच्याने साहय्याने हलवून एकजीव करून घ्या. ३० सेकंदासाठी या पीठाववर झाकण ठेवा. नंतर झाकण काढून पीठ एका मोठ्या ताटात काढून  घ्या.

भात गचगचीत होतो कधी कोरडा फडफडीत? कुकर लावताना वापरा ३ ट्रिक्स, मऊ होईल भात

त्यानंतर गॅस बंद करून ५ मिनिटांसाठी पीठ असंच बाजूला ठेवून द्या. नंतर पोटॅटो मॅशरच्या साहाय्याने किंवा हाताने पीठ व्यवस्थित एकसंथ करून घ्या.  थोडा थोडा थंड पाण्याचा हात लावून पीठ पुन्हा व्यवस्थित मळून घ्या.  पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर तूप घालून पुन्हा मळून घ्या.

फक्त १ पदार्थ कणकेत मिसळला; केली मऊ-फुगलेली चपाती; जर्मन महिलेचा व्हिडिओ व्हायरल

मोदक वळण्यासाठी छोटा गोळा तोडून तांदळाचं पीठ लावून घ्या त्यानंतर बोटांच्या साहाय्याने वाटीप्रमाणे आकार द्या. मध्यभागी अंठगा ठेवून बाजूची बोटं बाहेर ठेवून दाबत राहा. मध्यभागी जाडसर ठेवून किनार पातळ ठेवा.

तिसरे बोट आणि अंगठ्याच्या साहाय्याने ११ किंवा २१ कळ्या पाडा. यात मधोमध मोदकाचं सारण भरा. पाकळ्या एका दिशेने जवळ आणून मोदक व्यवस्थित बंद करा. तयार मोदकांच्या तळाला थोडं पाणी लावून मोदक पात्रात वाफवण्यासाठी ठेवा. १० ते १५ मिनिटांत परफेक्ट, सुबक मोदक बनून तयार होतील.

Web Title: Ganesh Chaturthi 2023 Special : Modak Recipe How to Make Perfect Modak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.