काही दिवसांतच आता सगळयांच्याच घरी लाडक्या बाप्पांचे आगमन होणार आहे. बाप्पाचे आगमन झाले म्हणजे रोजच्या आरत्या, पूजा, जेवणाच्या पंगती ओघाने आल्याचं. गणपतीची रोज आरती झाल्यावर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून प्रसाद देण्याची पद्धत आपल्याकडे असते. गणपतीच्या दर्शनाला पाहुणे घरी आल्यावर त्याच्यासाठी रोज आरती झाल्यावर प्रसाद काय करावा असा घरच्या गृहिणीला प्रश्न पडतो(Ganesh Chaturthi Special Instant Rasmalai Modak).
गणपतीचे दहा दिवस नेमका रोज नवीन कोणता प्रसाद करायचा यात घरच्या गृहिणीचा फार गोंधळ उडतो. त्यातही जर घरची गृहिणी वर्किंग वुमन असेल तर कामाच्या गडबडीत प्रसादाला रोज काय करावे या विचाराने तिची तारांबळ उडते. अशावेळी काहीतरी झटपट होणारा इन्स्टंट एखादा प्रसादाचा पदार्थ तयार करावा असे प्रत्येकीला वाटते. सणावाराच्या कामाच्या गडबडीत किंवा वर्किंग वुमन असल्याने रोज नवीन प्रसाद बनवणे शक्य होत नाही. अशावेळी आपण घरीच असणाऱ्या मोजक्याच साहित्याचा (Easy Modak Recipe) वापर करून झटपट तयार होणारे रसमलाई मोदक घरच्याघरीच तयार करु शकतो. रसमलाई मोदक कसे तयार करावेत याची सोपी रेसिपी पाहूयात(Rasmalai Modak Recipe).
साहित्य :-
१. पनीर - १/४ कप २. मिल्क पावडर - १/२ कप ३. पिठीसाखर १/२ कप ४. काजू पावडर - १/४ कप ५. दूध - २ टेबलस्पून ६. केसर - ७ ते ८ काड्या ७. वेलची पावडर - १/२ टेबलस्पून ८. पिस्त्याचे काप - ३ टेबलस्पून
खोबरं न वापरता करा फक्त १० मिनिटांत करा साऊथ इंडियन चटणी, चवीला बेस्ट आणि झटपट...
गौरी गणपती स्पेशल : फक्त १५ मिनिटांत करा कापसाच्या फुलांची सुंदर-नाजूक कंठी, पाहा भन्नाट आयडिया...
कृती -
१. सगळ्यांत आधी पनीरचे छोटे चौकोनी आकाराचे लहान लहान तुकडे करून घ्यावेत. हे तुकडे मिक्सरच्या भांड्यात ओतून हलकेच मिक्सरमधून फिरवून त्याचा जाडसर चुरा करुन घ्यावा. २. आता एका पॅनमध्ये तूप घेऊन ते व्यवस्थित वितळवून घ्यावेत. या तुपात मिक्सरमध्ये वाटून घेतलेले पनीर, मिल्क पावडर, पिठीसाखर, काजू पावडर घालून हे सगळे जिन्नस व्यवस्थित ढवळून एकजीव करुन घ्यावेत. त्यानंतर मंद ते मध्यम आचेवर गॅस ठेवून हे मिश्रण ६ ते ७ मिनिटे शिजवून घ्यावे. हे मिश्रण शिजवून घेताना ते सतत चमच्याने हलवत राहावे.
३. त्यानंतर एका वाटीत थोडेसे दूध घेऊन त्यात केसर भिजवत ठेवा. दूध आणि केसर यांचे मिश्रण या पॅनमधील मिश्रणात ओतावे. ४. आता हे मिश्रण पॅनमधून एका डिश मध्ये काढून थोडे थंड करुन घ्यावे. मिश्रण थंड झाल्यावर मोदकाच्या साच्याला आतून थोडेसे तूप लावून मग थोडे मिश्रण साच्यात घालून मोदक तयार करून घ्यावा. सगळ्यात शेवटी या तयार मोदकावर आपल्या आवडीप्रमाणे पिस्त्याचे काप लावून घ्यावेत.
अगदी कमी साहित्यात झटपट तयार होणारे रसमलाई मोदक खाण्यासाठी तयार आहे.