Join us  

डाळ न भिजवता, बुंदी न पाडता झटपट बनवा स्वादिष्ट मोतीचूर मोदक, तोंडात टाकताच विरघळणारा ' मोतीचूर मोदक ' कधी खाल्ला आहे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2023 10:45 AM

Ganesh Chaturthi Special : Motichur Modak Recipe : मोतीचूर मोदक करणे फारसे अवघड नाही तसेच त्याला फार काही कौशल्य लागत नाही. घरच्या घरी मोतीचूर मोदक बनवण्याची सोपी रेसिपी पाहूयात...

गणेश चतुर्थीचा खास सण हा मोदकांशिवाय साजरा केला जाऊच शकत नाही. गणपती बाप्पा आपल्या घरी येणार म्हटल्यावर पूजेच्या साहित्यापासून ते मखर सजावटी व दिव्यांची विशेष आरास करण्यापर्यंत विशेष तयारी केली जाते. पण या सगळ्यांसोबत बाप्पाला प्रसन्न करण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे त्याचा आवडता नैवेद्य. आपण विशेष करुन नैवेद्यात बाप्पाच्या आवडीचे खास मोदक बनवतो. आपल्याकडे उकडीचे व तळणीचे पारंपरिक मोदक हे तर हमखास बनवले जातात पण यासोबतच मोदकांचे वेगवेगळे प्रकार देखील बनवले जातात(Motichoor Modak).

गणेशोत्सवात नैवद्यासाठी मोदक करण्याची मुख्य प्रथा असली तरीही काहीतरी बदल म्हणून आपण काहीवेळा मोदकांचे नवीन प्रकार बनवतो. सध्या बाजारांत मोदकांचे अनेक नवनवीन प्रकार अगदी सहज विकत मिळतात. काहीवेळा नैवेद्य म्हणून आपण बाप्पाला मोदकांसोबतच लाडू देखील दाखवतो. अशावेळी बेसन, रवा, मोतीचूर (How To Make Motichoor Modak) अशा अनेक प्रकारचे लाडू देखील बनवले जातात. अशावेळी आपण घरच्या घरी होणारे मोतीचूर मोदक देखील नैवेद्य म्हणून बाप्पाला दाखवू शकतो. मोतीचूर मोदक करणे फारसे अवघड नाही तसेच त्याला फार काही कौशल्य लागत नाही. घरच्या घरी मोतीचूर मोदक बनवण्याची सोपी रेसिपी पाहूयात(Ganesh Chaturthi Special : Motichur Modak).    

साहित्य :- 

१. बेसन - १/२ कप २. पाणी - १/३ कप ३. केशरी रंग - चिमूटभर ४. बेकिंग सोडा - चिमूटभर५. तेल / साजूक तूप - ३ ते ४ टेबलस्पून (तळण्यासाठी)६. साखर - १/२ कप ७. पाणी - १/४ कप ८. केसर - ४ ते ५ काड्या ९. वेलची पावडर - १/२ टेबलस्पून १०. टरबुजाच्या बिया - १ टेबलस्पून 

नैवेद्याचे पंचामृत उरले तर त्याला थोडासा मॉर्डन टच देऊन झटपट बनवा पंचामृत केक...

गुलाबजामचा उरलेला पाक फेकून न देता करा झटपट होणारे गुलगुले, पाक वाया न जाता बनेल नवीन गोड पदार्थ...

कृती :- 

१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यात पाणी मिसळून त्याची घट्टसर पेस्ट बनवून घ्यावी२. या बेसनाच्या घट्टसर पिठात चिमूटभर खायचा केशरी रंग घालून घ्यावा. ३. आता एका कढईत तेल घेऊन त्यात या तयार बेसनाच्या पिठाचे बॅटर सोडून बेसनाचा चुरा तळून घ्यावा. ४. त्यानंतर हा बेसनाचा चुरा मिक्सरला वाटून घेऊन त्याचा चुरा बनवून घ्यावा. ५. आता एका मोठ्या पॅनमध्ये साखर व पाणी घेऊन ती संपूर्णपणे वितळवून त्याचा पाक तयार करुन घ्यावा. 

फक्त २० मिनिटांत करा १ कप रव्याचे मोदक, फ्रिजमध्ये १० दिवसही टिकणाऱ्या मोदकांची सोपी रेसिपी...

उकडीच्या मोदकांचे गणित जमत नाहीत, उकडताना फुटतात ? १० सोप्या टिप्स, कळीदार सुबक मोदक सहज जमतील...

६. साखरेचा पाक तयार होत आल्यावर त्यात केसरच्या काड्या व चिमूटभर खायचा रंग घालावा. ७. याचा एकतारी पाक तयार झाल्यावर यात तयार करुन घेतलेला बेसनाचा चुरा घालावा. ८. सगळ्यांत शेवटी यात टरबुजाच्या बिया व वेलची पावडर घालून सगळे मिश्रण चमच्याने ढवळून एकजीव करुन घ्यावे. ९. आता मोदकाचा साचा घेऊन त्यात हे तयार मोतीचूर सारण भरुन घ्यावे. १०. सर्वात शेवटी प्रत्येक एका मोदकावर केसरची काडी सजावटीकरिता लावून घ्यावी. 

ना उकड घ्यायचं टेंशन, ना सारणाची - ना तळणाची घाई ! गॅसही न पेटवता करता झटपट मोदक...

आपले मोतीचूर मोदक खाण्यासाठी तयार आहेत.

टॅग्स :गणेशोत्सवपाककृतीअन्नगणेश चतुर्थी रेसिपी