Join us  

गणेशोत्सव स्पेशल : बाप्पाच्या नैवेद्याला पंचखाद्य तर हवेच, १० मिनिटात करा हा पारंपरिक पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2024 12:31 PM

Panchkhadya Recipe : Ganesh Chaturthi Special Prasad Nevedya Panchkhadya : पाच जिन्नस एकत्रित करुन तयार केलेले 'पंचखाद्य' बाप्पाच्या आवडीचा पदार्थ तितकाच पौष्टिकही आहे..

कोकणात फार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा सण म्हणजे गणेश चतुर्थी. ‘गणेश चतुर्थी’ या दोन शब्दांनीच कोकणी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह भरभरून वहायला लागतो. इतर प्रांतात गणरायाच्या आगमनाबरोबर सुरू होणारा हा सण कोकणी माणसाच्या मनात तसा खूप आधीपासूनच सुरु होतो. गणपतीची मूर्ती कशी असावी ते दहा दिवस प्रसादासाठी काय द्यावे इथपर्यंत सगळ्याच गोष्टींची अतिशय जोरदार तयारी सुरु असते. गणपती बाप्पाचे स्वागत सगळ्यांच्याच घरी अगदी थाटामाटात केले जाते. गावखेड्यात अजूनही सगळेजण मिळून एकत्र सगळ्यांच्या घरी बाप्पांच्या आरतीसाठी जातात. आरती झाल्यावर आपल्याकडे प्रसाद देण्याची प्रथा असते(Panchkhadya recipe).

कोकणातील बहुतेक घरांमध्ये आरती झाली की आरोग्याला पौष्टिक आणि पारंपरिक असा पदार्थ प्रसाद म्हणून दिला जातो, तो म्हणजे 'पंचखाद्य'. काजू, सुकं खोबरं, चणा डाळ, शेंगदाणे, लाह्या असे प्रमुख पाच पदार्थ एकत्रित करून हा प्रसाद तयार केला जातो म्हणून याला 'पंचखाद्य' (Panchkhadya Prasad Recipe) असे म्हटले जाते. जर आपण वर्किंग वुमन असाल किंवा कामाच्या गडबडीत रोज दहा दिवस प्रसादासाठी नेमका कोणता पदार्थ तयार करायचा असा प्रश्न पडत असेल तर, आपण कोकणातील गणेशोत्सवात हमखास दिला जाणारा हा पारंपरिक गोड पदार्थ तयार करु शकतो. अगदी कमी साहित्यात पटकन तयार होणारा हा प्रसाद कसा करायचा याची रेसिपी पाहूयात(Ganesh Chaturthi Special Prasad Nevedya Panchkhadya). 

साहित्य :- 

१. काजू - १ कप २. सुकं खोबरं - १ कप ३. चणा डाळ - १ कप ४. शेंगदाणे - १ कप ५. गूळ - १ कप ६. पाणी - गरजेनुसार ७. वेलचीपूड - १/२ टेबलस्पून ८. लाह्या - ३ ते ४ कप 

गणेशोत्सव स्पेशल : घरीच झटपट करा रसमलाई मोदक, कपभर पनीर आणि फक्त १० मिनिटांत मोदक तयार...

गौरी गणपती स्पेशल : फक्त १५ मिनिटांत करा कापसाच्या फुलांची सुंदर-नाजूक कंठी, पाहा भन्नाट आयडिया... 

कृती :- 

१. सगळ्यांत आधी एका कढई गॅसवर ठेवून ती व्यवस्थित गरम होऊ द्यावी. त्यानंतर अनुक्रमे काजू, सुकं खोबरं, चणा डाळ, शेंगदाणे असे सगळे जिन्नस एक एक करून कोरडे भाजून घ्यावेत. २. आता एक मोठं पातेल घेऊन त्यात किसलेला गूळ आणि गरजेनुसार पाणी घालून या गुळाचा एकतारी पाक तयार करुन घ्यावा. 

३. एकतारी पाक तयार झाल्यानंतर त्यात सगळे भाजून घेतलेले जिन्नस व वेलचीपूड घालून मिक्स करून घ्यावेत. त्यानंतर या मिश्रणात लाह्या घालूंन सगळे जिन्नस गुळाच्या पाकात व्यवस्थित मिक्स करुन घ्यावेत. 

गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी लागणारा कोकणातील खास पारंपरिक पंचखाद्य प्रसाद खाण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :अन्नपाककृतीगणपती 2024गणेश चतुर्थी २०२४गणेश चतुर्थी रेसिपी