Join us  

गणेश जयंतीला लाडक्या बाप्पासाठी २० रूपयांत करा ओरिओ मोदक; स्वादीष्ट मोदकांची सोपी रेसेपी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 1:24 PM

Ganesh Jayanti 2023 : आपल्या सर्वांच्याच घरी चहाबरोबर बिस्कीट्स खाल्ले जातात. ओरिओ बिस्किटपासून सुबक, स्वादीष्ट मोदक अगदी कमीत कमी वेळात तयार करता येऊ शकतात.

माघी गणेशोत्सव (Ganesh Jayanti 2023) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. गणपती बाप्पाचा आवडता नैवेदय म्हणजे मोदक. उकडीचे मोदक नेहमीच बाप्पाच्या नैवेद्यासाठी दाखवले जातात. हे मोदक करताना फाटतात तर कधी सारण जास्तच पातळ होतं आणि खूप वेळही जातो. कमीत कमी वेळात तयार होतील असे मोदक बाप्पाला नैवेद्यासाठी ठेवले तर काम अधिक सोपं होईल.

आपल्या सर्वांच्याच घरी चहाबरोबर बिस्कीट्स खाल्ले जातात. ओरिओ बिस्किटपासून सुबक, स्वादीष्ट मोदक अगदी कमीत कमी वेळात तयार करता येऊ शकतात. ओरियो मोदकांची रेसेपी पाहूया. (Make Oreo Modak for 20 Rupees for Dear Dad on Ganesh Chatuthi; Easy recipe of delicious modaks)

साहित्य

ओरियो बिस्किट - 3 पॅकेट

मलई - (मलाई) 7-8 चमचे

नारळ पावडर - 4 चमचे

तूप - साच्याला ग्रीस करण्यासाठी

कृती

१) मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम पाकिटातून सर्व बिस्किटे काढा.

२) त्यानंतर प्रत्येक बिस्किटातून सुरीने क्रीम काढून वेगळे ठेवा.

३) आता सर्व बिस्किटांचे छोटे-छोटे तुकडे करून एका मिक्सर जारमध्ये ठेवा आणि त्यांची बारीक पावडर करा.

४)  त्यानंतर बिस्किटाची पूड चाळून एका भांड्यात ठेवा.  बिस्किट गाळून घेतल्यानंतर जाडसर तुकडा असेल तर त्याची पुन्हा पावडर करून घ्यावी.

५) आता या पावडरमध्ये थोडे-थोडे मलई घाला, मिक्स करा आणि हाताने मळून घ्या जेणेकरून गुळगुळीत पीठ तयार होईल.

६) आता तुम्ही बिस्किटांची क्रिम काढली आहे. त्यात नारळ पावडर घालून हाताने मिक्स करा.

७) मोदकाच्या साच्याला तूप किंवा तेल लावून साचा बंद करावा. तयार मिश्रणातून थोडेसे मिश्रण घेऊन मोदकाच्या साच्यात भरा.

८) नंतर मधोमध क्रीम व खोबऱ्याचे सारण भरून चांगले दाबून घ्या.  नंतर वरून थोडे अधिक बिस्किट मिश्रण लावा आणि चांगले दाबा. सारण जास्त भरू नये, नाहीतर बाहेर पडू लागेल. साच्यातील अतिरिक्त पीठ काढून टाका. मोदकाचा साचा हळूवारपणे उघडा आणि त्यातून मोदक काढून प्लेटमध्ये ठेवा.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नकिचन टिप्सगणेश चतुर्थी रेसिपी