Lokmat Sakhi >Food > वाटली डाळ खूप उरली, काय कराल? ४ पदार्थ -वडे-कटलेट ते डाळ मोमो.. खमंग नाश्ता

वाटली डाळ खूप उरली, काय कराल? ४ पदार्थ -वडे-कटलेट ते डाळ मोमो.. खमंग नाश्ता

वाटली डाळ खूप उरली तर करायचं काय हा प्रश्न घरोघर दरवर्षी पडतोच, त्याचं हे उत्तर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2022 01:50 PM2022-09-10T13:50:32+5:302022-09-10T14:01:19+5:30

वाटली डाळ खूप उरली तर करायचं काय हा प्रश्न घरोघर दरवर्षी पडतोच, त्याचं हे उत्तर.

Ganesh Utsav 2020, Naivedya Maharashtra traditional vatli Dal, 4 ideas to use vatli Dal | वाटली डाळ खूप उरली, काय कराल? ४ पदार्थ -वडे-कटलेट ते डाळ मोमो.. खमंग नाश्ता

वाटली डाळ खूप उरली, काय कराल? ४ पदार्थ -वडे-कटलेट ते डाळ मोमो.. खमंग नाश्ता

Highlightsवाटल्या डाळीचे ५ पदार्थ करुन पहा.. करायलाही सोपे आणि चविष्ट. पुन्हा पोषणही.

गणपतीसाठी शिदोरी म्हणून केलेली  गणपतीला शिदोरी म्हणून वाटली डाळ तर केली. भरपूर मनसोक्त खाल्ली. वर्षातून एकदा ही डाळ होते, गणपतीत तिची जशी चव लागते तशी एरव्ही केली तरी लागत नाही.  वाटली डाळ कुणी चिंचेच्या पाण्याचा शिपका मारुन करते तर कुणी लिंबू पिळून. पण ही डाळ परतावी मात्र मंद गॅसवरच लागते. ना फार बारीक भूगा ना डाळ जास्त जाड. मध्यम हवे सारे. खाताना टोटरा बसायला नको की फार गचकाही नको. डाळ प्रमाणात जमली तर पोटालाही मानवते. अशी आवडती डाळ मात्र प्रसाद म्हणून भरपूर वाटूनही वाटली डाळ उरली तर काय कराल? पाण्याचा शिपका मारुन परत गरम करुन खाणे हा उत्तम उपाय आहेच. मुरलेली डाळ चांगली लागतेच. पण डाळ भरपूर असली तर तो पर्यायही फार कामाचा नाही.
अशावेळी ५ आयडिया.
वाटल्या डाळीचे ५ पदार्थ करुन पहा..
करायलाही सोपे आणि चविष्ट. पुन्हा पोषणही.

(Image : Google)

१. वाटल्या डाळीच्या पुऱ्या.
डाळ घ्यायची. जरासा पाण्याचा हात लावायचा. मिरची वाटून घालायची, (तिखट आपल्याला हवे तसे) को‌थिंबीर, ओवा, मीठ, हळद. डाळीत आधीच तिखट मीठ आहेच. मग त्यात बसेल असे गव्हाचे पीठ घालायचे. घट्ट मळायचे. आणि पुऱ्या लाटून तळायचे. अतिशय खमंग खुसखुशीत पु्ऱ्या तयार.

२. वाटल्या डाळीचे कटलेट
शिल्लक डाळ, उकडलेला बटाटा, कॉर्न फ्लॉवर. किंवा डाळीचे पीठ, घरात असतील त्या भाज्या, आलं लसूण पेस्ट, तिखट मीठ तीळ ओवा.
कटलेटप्रमाणे भिजवायचे. कटलेट थापून घोळवून घ्यायचे रव्यात. कमी तेलात शॅलो फ्राय करायचे. हे डाळ कटलेट अतिशय सुंदर.

(Image : Google)

३. वाटल्या डाळीचे मोमो
हा पदार्थ तर करायलाही सोपा.
वाटली डाळ सारण म्हणून तयार असते. मैदा जरा तेल घालून भिजवायचा. पारी लाटून मोदकासारखी भरायची. छान वाफवून घ्यायची. झालेले डाळीचे माेमो.

४. वाटल्या डाळीचे भाजणी वडे
वाटली डाळ, भाजणीचे पीठ, तीीखट मीठ ओवा तीळ हे सारे छान कालवून. लहान लहान डाळ भाजणी वडे करायचे. मस्त तेलात खमंग तळून घ्यायचे. सॉस-चटणीसोबत नाश्ता.
 

Web Title: Ganesh Utsav 2020, Naivedya Maharashtra traditional vatli Dal, 4 ideas to use vatli Dal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.