Lokmat Sakhi >Food > बाप्पासाठी खास नैवेद्य, सुकामेवा-खजूराचे मोदक, पौष्टिक मोदक करण्याची सोपी रेसिपी

बाप्पासाठी खास नैवेद्य, सुकामेवा-खजूराचे मोदक, पौष्टिक मोदक करण्याची सोपी रेसिपी

How to Make Khajur (dates)- Dry Fruits Modak: रेसिपी अतिशय सोपी असून यासाठी तुम्हाला काहीही तळण्याची किंवा भाजण्याची गरज नाही. सगळे साहित्य एकत्र करा आणि मस्त चवदार खजूर मोदक बनवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2022 07:03 PM2022-08-27T19:03:01+5:302022-08-27T19:04:28+5:30

How to Make Khajur (dates)- Dry Fruits Modak: रेसिपी अतिशय सोपी असून यासाठी तुम्हाला काहीही तळण्याची किंवा भाजण्याची गरज नाही. सगळे साहित्य एकत्र करा आणि मस्त चवदार खजूर मोदक बनवा.

Ganpati Festival: Khajur or dates, dry fruits modak recipe for ganpati festival | बाप्पासाठी खास नैवेद्य, सुकामेवा-खजूराचे मोदक, पौष्टिक मोदक करण्याची सोपी रेसिपी

बाप्पासाठी खास नैवेद्य, सुकामेवा-खजूराचे मोदक, पौष्टिक मोदक करण्याची सोपी रेसिपी

Highlightsरेसिपी अतिशय सोपी असून यासाठी तुम्हाला काहीही तळण्याची किंवा भाजण्याची गरज नाही. सगळे साहित्य एकत्र करा आणि मस्त चवदार खजूर मोदक बनवा.

१० दिवसांच्या गणेशोत्सवात सकाळ- संध्याकाळ गणरायाची (Ganeshotsav) आरती केली जाते. आरतीच्या वेळी दररोज वेगळा नैवेद्य केला जातो. अशा वेळी रोज काय करायचं असा प्रश्न पडतोच. त्यासाठीच बघा ही खास रेसिपी (khajur modak). या रेसिपीमध्ये आपण खजुर आणि सुकामेवा यांचा उपयोग करून पौष्टिक मोदक करणार आहोत. हे मोदक ७ ते ८ दिवस आरामात टिकतात. शिवाय त्यात खजूर आणि सुकामेवा असल्याने ते आरोग्यासाठीही अतिशय पोषक ठरतात. गणपती उत्सवात कुणाच्या घरी दर्शनाला जाणार असाल, तर असा प्रसाद घेऊन जाणं एकदम परफेक्ट ठरेल. (perfect recipe for khajur modak)

 

खजूर मोदक करण्याची रेसिपी
साहित्य

मऊसर असणारे खजूर एक कप, बदाम, काजू, मनुका, अक्रोड, पिस्ते अशा सगळ्या सुकामेव्याचे काप २ कप, पाव कप तूप.
रेसिपी
- बाजारात २ प्रकारचे खजूर मिळतात. काही कडक असतात तर काही मऊसर आणि एकदम मगजदार असतात. आपल्याला या रेसिपीसाठी दुसऱ्या प्रकारचे खजूर वापरायचे आहेत, जे मऊ असतात.
- आता सगळ्यात आधी खजूराच्या बिया काढून खजूर थोडे हातानेच दाबून घ्यावेत.


- यानंतर बदाम, काजू, मनुका, अक्रोड आणि पिस्ते या सगळ्या सुकामेव्याचे बारीक बारीक काप करून घ्यावेत.
- काप करणं कठीण वाटत असेल तर ते मिक्सरमधून जाडेभरडे फिरवून घेतले तरी चालेल. पण त्यांची एकदम बारीक पावडर करून टाकू नका. कारण मोदकांमध्ये थाेडा सुकामेव्याचा क्रंच असला, तर ते अधिक चवदार लागतील.
- आता खजूर आणि सुकामेव्याचे काप एका बाऊलमध्ये एकत्र करा. त्यात तूप टाका.
- हे सगळं मिश्रण हाताने व्यवस्थित मळून घ्या. मिश्रण चांगलं एकजीव झालं पाहिजे. एकजीव होत नसेल तर त्यात पुन्हा थोडंसं तूप घालू शकता.
- आता हे सारण थोडं थोडं हातावर घेऊन त्याचे मोदकासारखे आकार करा. प्रसादासाठी खजूराचे मोदक झाले तयार. 


 

Web Title: Ganpati Festival: Khajur or dates, dry fruits modak recipe for ganpati festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.