घरोघरी आज गणपती बाप्पांचे आगमन झालं. बाप्पाच्या नैवेद्यासाठी आजपासून एकापेक्षा एक पदार्थ बनवायाला सुरूवात झाली असेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोदक. उकडीचे मोदक न बनवता वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार करण्याकडे बायकांचा कल असतो. कारण गणपतीच्या पहिल्यादिवशी उकडीचे मोदक केल्यानंतर बाकीच्या दिवशी दुसरा काय नैवेद्य, प्रसाद बनवता येईल याचा सगळ्याच महिला विचार करतात.
तुम्ही वेगळ्या आणि हटके स्टाइलचे चविष्ट मोदक घरच्या घरी तयार करू शकता. जाणून घेऊयात अशाच हटके पान मोदकांची रेसिपी. या मोदकांची चव आणि रंग खूपच भन्नाट असतो. त्यामुळे खाणारेही हा मोदक जीभेवर ठेवताच खुश होतात. जाणून घ्या पान मोदकांची रेसेपी.
साहित्य
1/2 कप साखर
2 कप डेसिकेटेड कोकोनट
1/2 लिटर सायीसकट दुध
अर्धा चमचा थेंब हिरवा फुड कलर
2-3 थेंब रोझ इसेन्स
5-6 विड्याची पाने
कृती
१) सगळ्यात आधी गॅसवर खोलगट भांडं ठेवा. मग त्यात साखर, दुध आणि कोकोनट पावडर एकत्र करून मंद आचेवर ठेवा.
२) गॅसवरील मिश्रण आटेपर्यंत ढवळत राहा .
३) विड्याची पाने स्वच्छ धुवून पुसून किंचित दुध घालून मिक्सरमध्ये जाडसर वाटा. नंतर गॅसवरील मिश्रणात वाटलेल्या पानांची पेस्ट घाला.
४) मिश्रण कडा सोडून घट्ट झाले की,फुड कलर, इसेन्स घाला.थंड करत ठेवा.
५) पुर्णपणे थंड झाल्यावर मोदकाच्या साच्यात घालून मोदक तयार करा.
६) तयार आहेत स्वादिष्ट पान मोदक.