Join us  

जेवताना तोंडी लावण्यासाठी करा झणझणीत, चटकदार लसणीची चटणी; घ्या पारंपरिक परफेक्ट रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 12:15 PM

Garlic Chutney Recipe : नावडती भाजी असेल तर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तुम्ही चटणी खाऊ शकता.

जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी ठेचा किंवा लसणाची चटणी असेल तर साध्या जेवणालाही चव येते. लसणाची  चटणी वडापाव, समोसा पाव भजीसोबत खूप खाल्ली जाते. (Garlic Chutney Recipe) आतापर्यंत तुम्ही लसणीची सुकी चटणी खूपदा खाल्ली असेल पण ओली चटणीसुद्धा ट्राय करू शकता. नावडती भाजी असेल तर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तुम्ही चटणी खाऊ शकता. अगदी कमीत वेळीत ही लसणीची तयार होते. (Lasun Chutney Recipe)

लसणाचे फायदे  (Benefits of garlic)

१) रोज एक लसूण खाल्यानं गॅस्ट्रीक ज्यूसच्या पीएचमध्ये सुधारणा होते. यामुळ पचनक्रिया व्यवस्थित रहाते. 

२) एंटीमायक्रोबियल गुण आतड्यांमधील बॅक्टेरिया आणि मायक्रोबियल संक्रमण रोखतात. लसणात बायोएक्टिव्ह यौगिक कोलायटिस, अल्सर आणि इतर गॅस्ट्रोइंस्टेस्टायनल आजार कमी करण्याची क्षमता असते. 

३) लसूण रक्तदाब कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण ते नायट्रोजन ऑक्साईड आणि H2S या दोन्ही वासोडिलेटिंग एजंट्सच्या उत्पादनास उत्तेजन देते. याव्यतिरिक्त, ते व्हॅसोकॉन्स्ट्रक्शन एजंट्सचे उत्पादन कमी करते.

४) एलडीएल कोलेस्टेरॉलचे ऑक्सिडेशन आणि रक्तवाहिन्यांमधील प्लेक रोखून लसणाची एकाग्रता रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.

५) अनेक अभ्यासांनी असे सुचवले आहे की लसूण जळजळ कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करू शकते, जे त्याच्या सामग्रीमुळे अँटिऑक्सिडंट्स आणि अॅलिसिन सारख्या सल्फर-युक्त संयुगे असू शकते.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न