Join us  

भाजलेल्या लसणाची चटकदार चटणी करा फक्त १० मिनिटांत, एकदा खाल तर..

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 12:22 PM

Garlic chutney Recipe : भाजलेल्या लसणाची चटणीसुद्धा तितकीच चवदार लागते. या चटणीची सोपी रेसेपी पाहूया.

रोजच्या जेवणात नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ असतील तर खाण्याची फार इच्छा नसते. (Cooking Tips) अशावेळी जर तोंडी लावणीसाठी पापड, लोणचं किंवा चटण्या असतील तर साधं जेवणही रुचकर लागतं. भाकरी, चपाती किंवा भाताबरोबरही तुम्ही चटणी खाऊ शकता. भारतीय जेवणाची थाळी ही चटण्यांशिवाय अपूर्ण आहे. (Red Garlic Chutney) शेंगदाण्याची चटणी, तिळाची चटणी, लसणाची चटणी, कांद्याची चटणी असे वेगवेगळे प्रकार तुम्ही आतापर्यंत ट्राय केले असतील. भाजलेल्या लसणाची चटणीसुद्धा तितकीच चवदार लागते. या चटणीची सोपी रेसेपी पाहूया.(How to make garlic chutney)

लसणाची ओली चटणी बनवण्याची कृती

१) लसणाची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी ४ ते ५ लसूण भाजून घ्या. तुम्ही तव्यावर लसूण भाजू शकता किंवा एका जाळीवर लसूण ठेवून ते सगळ्या बाजूने भाजून घ्या. त्यानंतर एका कढईत बडीशेप, धणे, जीरं, ओवा भाजून घ्या.  मग एका दुसऱ्या भांड्यात  सुक्या लाल मिरच्या, भाजलेले साल काढलेले लसूण, लाल तिखट, मीठ, लिंबू आणि भाजून घेतलेले मसाले घाला.

२) मिक्सरमधून हे मिश्रण वाटून घ्या. त्यावर गरम तेल घाला. तयार आहे लसणाची चविष्ट चटणी, ही चटणी अगदी ५ मिनिटांत तयार होते यासाठी तुम्हाला जास्त मेहनतही करावी लागणार नाही. (How to make garlic chutney at home)

लसणाची सुकी चटणी कशी बनवायची

१) लसणाची सुकी चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी पॅन गरम करून ठेवा.  पॅनमध्ये १ चमचा तेल घाला. गरम तेलात १/४ कप लसणाच्या पाकळ्या घाला. लसूण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या. आता फ्राय लसणात १ चमचा शेंगदाणे घालून मंद आचेवर भाजून घ्या.  

२) त्यात १ चमचा तीळ, १ चमचा जीरं, १ चमचा धणे आणि १/४ चमचे मेथी घाला. नंतर सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करा. ही पेस्ट मिक्सरच्या भांड्यात घाला वर १ चमचा लाल मिरची, १/४ चमचा हळद, १ चमचा आमचूर पावडर, चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा मीठ घालून एकत्र करा. तयार आहे लसणाची सुकी चटणी

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न