Join us  

५ मिनिटांत करा लसणाची झणझणीत चटणी, चिमूटभर खा-पावसाळ्यात कमी झालेली भूक खवळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 5:13 PM

Garlic Chutney Recipe : लसूण घालून तुम्ही ओली, सुकी, खोबरं घातलेली, शेंगदाणे  घाललेली, लसूण आणि लाल मिरचीची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवू शकता.

जेवताना भाकरी किंवा भातासोबत खायला चटणी किंवा  लोणचं असं काही असेल तर जेवणाची मजाच काही वेगळी असते. साध्या जेवणाचीही रंगत चटणीमुळे वाढते. वेळेअभावी अनेकजण लोणची, चटण्या घरी बनवणं टाळातात. (Red Garlic Chutney)  विकतच्या पदार्थांना जास्त मागणी आहे. (Garlic Chutney Recipe) आपल्या सर्वांच्याच स्वयंपाकघरात लसूण असतात. लसूण घालून तुम्ही ओली, सुकी, खोबरं घातलेली, शेंगदाणे  घाललेली, लसूण आणि लाल मिरचीची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवू शकता. भाकरी किंवा चपातीला लावून खाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. (How to make garlic chutney)

लसणाची चटणी बनवण्याचे साहित्य

लसूण - १ कप

लाल मिरची पावडर - १.५  टीस्पून

धने पावडर - १ टीस्पून

आमचूर पावडर - १ टीस्पून

हळद - १/२ टीस्पून

मीठ - आवडीनुसार

तेल- ४ टीस्पून

जिरे- १ टीस्पून

हिंग- १ टीस्पून

लसणाची ओली चटणी बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया

1) लसणाची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक कप सोललेले लसूण घेऊन खलबत्त्यात कुटा.

2) यात १ चमचा मीठ, १ चमचा लाल तिखट, १ चमचा धणे पावडर,१ चमचा आमचूर पावडर,१ चमचा हळद घाला मग पुन्हा बारीक कुटून घ्या.

3) लसणाची बारीक पेस्ट तयार झाल्यानंतर खलबत्त्यातून एका वाटीत ही पेस्ट काढा.

4)  एका कढईत तेल गरम करून त्यात जिऱ्याचे दाणे घाला, जिरं तडतडल्यानंतर त्यात हिंग घाला.

5) मग लसणाची पेस्ट तेलात घालून एकजीव करून घ्या.

6) तेलात घातल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित पतरवून घ्या. तयार आहे लज्जतदार लसणाची चटणी.

 

टॅग्स :किचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्न