Join us  

मोजून १० मिनिटांत करा कोकण स्टाइल खोबरं-लसणाची चटणी, पारंपरिक लसणीचं तिखट करऱ्याची रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2023 3:29 PM

Garlic Coconut Chutney- kokan Style Lasunichi Chutney जेवताना तोंडी लावायला ही चटणी असेल तर चार घास जास्तच जेवाल.

जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण ताटात लोणचं, चटणी, पापड हे पदार्थ घेतोच. हे पदार्थ जेवणाची रंगत वाढवतात. महाराष्ट्रात विविध प्रकारच्या चटण्या फेमस आहे. ज्यात लसणाची चटणीही प्रचंड प्रमाणावर खाल्ली जाते. अनेक जण लसूण खाताना नाकं मुरडतात. पण लसूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

लसणाची चटणी बनवायला एकदम सोपी असते. ओली चटणी, सुकी चटणी, कांदा घालून, खोबरं घालून अशा वेगवेगळ्या पद्धतीनं लसणाची चटणी बनवली जाते. कोकण स्टाईल लसणाची सुकी चटणी अनेकांकडे केली जाते. ही रेसिपी कमी साहित्यात कमी वेळात बनते. चला तर मग या पदार्थाची कृती पाहूयात(Garlic Coconut Chutney- kokan Style Lasunichi Chutney).

लसणाची चमचमीत चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य

सुकं खोबरं

लाल मिरच्या

करा कोबीची कुरकुरीत भजी, चवीला उत्कृष्ट पचायला हलकी

लसणाच्या पाकळ्या

मीठ

अशी करा लसणाची चटकदार चटणी

सर्वप्रथम, गरम तव्यावर तेल घालून लसूण लालसर होईपर्यंत भाजून घ्या, लसूण भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढा. त्यानंतर लाल मिरच्या भाजून घ्या, व प्लेटमध्ये काढा. त्यानंतर किसलेलं सुकं खोबरं भाजून घ्या. व प्लेटमध्ये काढून ठेवा. हे मिश्रण थंड होण्यासाठी काही वेळ बाजूला ठेवा.

वांगी कोवळी-चविष्ट आहेत की निबर-बियांवाली हे ओळखण्याच्या २ टिप्स, खरेदी करतानाच लक्षात ठेवा

आता मिक्सरचं भांडं घ्या, त्यात भाजलेलं सुकं खोबरं, लाल मिरच्या, लसणाच्या पाकळ्या व मीठ घालून मिश्रण जाडसर वाटून घ्या. अशा प्रकारे १० मिनिटात चटकदार लसणाची चटणी खाण्यासाठी रेडी. आपण ही चटणी हवाबंद डब्यात साठवून ठेऊ शकता. ही चटणी १५ दिवस आरामात टिकते. जेवणाची रंगत वाढवण्यासाठी ही चटणी एकदा नक्की घरी करून पाहा. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स