Join us  

सायंकाळच्या चहाची रंगत वाढवेल गार्लिक पोटॅटो स्टिक, घरगुती साहित्यात कुरकुरीत रेसिपी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2023 5:53 PM

With Tea make Crispy Garlic Potato Sticks बटाटा आणि लसणाला द्या हटके ट्विस्ट, गार्लिक पोटॅटो स्टिक, स्नॅक्ससाठी उत्तम ऑप्शन

कित्येकांना बटाट्यापासून बनलेले पदार्थ फार आवडतात. बटाट्याची भाजी, भजी, आलू पुरी असे विविध पदार्थ बनवले जातात. आपल्याला जर सायंकाळची छोटी भूक भागवण्यासाठी काही चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर, गार्लिक पोटॅटो स्टिक ही रेसिपी ट्राय करून पाहा. चमचमीत या पदार्थात बटाटा आणि लसणाची हटके कॉम्बिनेशन चाखायला मिळेल. ही रेसिपी बनवायला सोपी तर आहेच, यासह चवीला उत्कृष्ट लागते. आपण ही सायंकाळच्या चहासोबत खाऊ शकता. ही लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडेल. कमी आणि घरगुती साहित्यात ही रेसिपी कशी बनते पाहा.

गार्लिक पोटॅटो स्टिक या रेसिपीसाठी लागणारं साहित्य

बटाटे - ५

मीठ

कोथिंबीर

मोजेरिला चीज़

आलं

लाल तिखट

कॉर्न स्टार्च

तेल

कृती

गार्लिक पोटॅटो स्टिक बनवण्यासाठी सर्वप्रथम, बटाट्याचे साल काढून काप करा. दुसरीकडे एका भांड्यात पाणी आणि मीठ टाकून गरम करण्यासाठी ठेवा. त्यात बटाटे टाकून शिजवत ठेवा. बटाटे शिजल्यानंतर त्यातील पाणी काढून घ्या. उकडलेले बटाटे एका बाऊलमध्ये काढून स्मॅश करून घ्या. त्यानंतर यात बारीक चिरलेली कोथिंबीर, मोजेरिला चीज़, बारीक चिरलेलं सुकं आलं, लाल तिखट, कॉर्न स्टार्च टाकून मिक्स करा.

आता चॉपिंग बोर्डवर थोडे कॉर्न स्टार्च पसरवा. त्यावर बटाट्याचे मिश्रण लाटून घ्या. व चाकूच्या सहाय्याने लांब काप करून घ्या. आता एका कढईत तेल गरम करत ठेवा. त्या तेलात बटाट्याचे तयार स्टिक तळून घ्या. अशाप्रकारे गार्लिक पोटॅटो स्टिक खाण्यासाठी रेडी. आपण ही रेसिपी सॉस अथवा चटणीसह खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स