Join us  

जेवताना तोंडी लावण्यासाठी करा लसूण-मिरचीची झणझणीत चटणी; ही घ्या स्वादीष्ट, लज्जतदार रेसेपी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 5:35 PM

Garlic Red Chilli Chutney : हिरव्या मिरच्यांऐवजी लाल मिरचीचा ठेचा खूपच चविष्ट लागतो.

जेवताना तोंडी लावणीसाठी लोणचं, चटणी, ठेचा खाण्याची मजाच काही वेगळी असते. कारण यामुळे साध्या जेवणालाही चव येते. हिवाळ्यात चपातीपेक्षा ज्वारी, बाजरीची भाकरी जास्त खाल्ली जाते. वरण भाताबरोबरही तुम्ही ही लसणीची चटणी खाऊ शकता. हिरव्या मिरच्यांऐवजी लाल मिरचीचा ठेचा खूपच चविष्ट, चवदार लागतो. (Easy And Quick Garlic Chutney) या लेखात लसूण, लाल मिरचीची चटणी बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया. (Cooking Hacks & Tips) ही लसणी १ आठवड्यापर्यंत चांगली राहू शकते. 

लसूण- मिरचीची चटणी कशी करायची?

ही चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी  वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या मिक्सरच्या भांड्यात  घाला. त्यानंतर त्यात जीरं, मिरची आणि काळं मीठ घाला. त्यात आवडीनुसार लिंबू  पिळू शकता आणि हे मिश्रण दळून घ्या. तयार आहे चविष्ट, चवदार  मिरची-लसणीची चटणी. ही चटणी तुम्ही चपाती, भाकरी किंवा डाळ-भातासोबत खाऊ शकता. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न