महालक्ष्मीचा सण हा सगळ्यात मोठा सण मानला जातो. कारण या सणामधलं सगळ्यात अवघड काम असतं ते म्हणजे गौरींच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशीचा नैवेद्याचा स्वयंपाक करणं (Gauri ganapati festival 2024). एरवी आपण पुरणाचा स्वयंपाक करतो. पण गौरींसाठी जो नैवेद्य केला जातो, त्यामध्ये सोळा भाज्या, ५ चटण्या असे अनेक वेगवेगळे प्रकार असतात. प्रत्येक घराच्या परंपरेनुसार यामध्ये थोडा- फार बदल होत जातो. हा स्वयंपाक करण्याचं अनेकींना खूप टेन्शन येतं. (Gauri ganapati festival cooking preparation). म्हणूनच या काही टिप्स बघा आणि त्यानुसार स्वयंपाकाची तयारी करून ठेवा. बघा अगदी दिड- दोन तासांत तुम्ही गौरींसाठी १६ भाज्या, ५ चटण्या असा सगळा साग्रसंगीत नैवेद्य तयार करू शकाल..(how to do fast cooking for gauri/ mahalaxmi naivedya?)
पटापट स्वयंपाक करण्याच्या ४ टिप्स
१. दोन- तीन कढई, पुरणाचा एक कुकर आणि वरण- भाताचा एक कुकर, पातेले, तवा, पळ्या, चमचे असं सगळं आदल्या दिवशी रात्रीच वेगळं काढून ठेवा. यामुळे शोधाशोध करण्यात वेळ जाणार नाही.
दारासमोर दररोज रांगोळी काढण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? विज्ञान सांगते की...
२. सोळा भाज्यांचा एकत्रित संग्रह अनेक भाजीविक्रेते देतात. तो आधीच आणून व्यवस्थित पाहून, स्वच्छ करून ठेवा. पालेभाज्या निवडून एकत्र करून ठेवा. त्याचबरोबर मिरच्या, कडिपत्ता, कोथिंबीर असं सगळं निवडून तयार ठेवा. काकडी, टोमॅटो, भेंडी अशा फळभाज्या आधीच स्वच्छ धुवून पुसून ठेवा. यामुळे खूप वेळ वाचतो आणि लगेचच भाज्या चिरायला घेता येतात.
३. पुरण किती लागणार आहे, त्या हिशेबाने डाळ मोजून भांड्यात टाकून ठेवा. त्या मापानुसार पुरणात गूळ- साखर किती घालणार आहात, त्याचेही मोजमाप करून ठेवा. वरण- भातासाठी डाळ- तांदूळही मोजून वेगळ्या भांड्यात काढून ठेवा.
चेहऱ्याचं सौंदर्य दिवसेंदिवस वाढेल! फक्त चमचाभर तूप घेऊन 'हा' उपाय करा, पिंपल्स- ॲक्ने गायब
४. शेंगदाण्याचा कूट, तिळाचा कूट धने- जिरेपूड असं सगळं आधीच करून ठेवा. गूळ किसून ठेवा, पिठीसाखर तयार ठेवा. वेलची पूड करून ठेवा. दही, दूध, तूप असं सगळं हाताशी असू द्या. यामुळे तुमचं काम खूप झटपट होईल.