आली गवर आली सोनपावली आली.. गणरायाच्या २ दिवसानंतर, घरोघरी आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज त्याच जोमात थाटामाटात जेष्ठ गौरीचे आगमन झाले. सकाळपासून गौरीच्या आगमनासाठी महिलावर्ग गडबडीत आहे. गौरीचे आवाहन झाले की, तिला भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. राज्यातील वेगवेळ्या प्रदेशात विविध परंपरा आहेत. विदर्भात यांना महालक्ष्मी म्हणून पूजले जाते. तर पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात गौरी-गंगा म्हणून पूजा केली जाते.
आजच्या दिवशी गौराईला भाकरी, अळूची वडी, मिक्स पाच पालेभाज्यांची भाजी, फळभाज्यांचे सार नैवद्य म्हणून दाखवले जाते. मिक्स पालेभाज्यांमध्ये ५ प्रकारच्या भाज्या असतात. या भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. ५ पालेभाज्यांची ही भाजी कशी तयार करायची पाहूयात(Gauri Special Mix Green Leafy Vegetables special Bhaji, healthy recipe).
५ पालेभाज्यांची पौष्टीक भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य
शेपू
चवळी
भाकरी कडक किंवा वातड होतात, १ चमचाभर १ पदार्थ घालून करा भाकरी, शिळी भाकरीही राहील मऊ
मेथी
चाकवत
भोपळ्याची पाने
भिजवलेले तांदूळ
भिजवलेली तूर डाळ
शेंगदाण्याचं कूट
तेल
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली हिरवी मिरची
मीठ
कृती
सर्वप्रथम, पालेभाज्या स्वच्छ धुवून चिरून घ्या. पॅनमध्ये २ चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, व हिरवी मिरची घालून भाजून घ्या. कांद्याला सोनेरी रंग आल्यानंतर त्यात वाटीभर शेंगदाण्याचं कूट घालून भाजून घ्या. नंतर त्यात २ छोटे चमचे भिजवलेले तांदुळ आणि तुरीची डाळ घालून मिक्स करा. साहित्य भाजून झाल्यानंतर त्यात चिरलेल्या भाज्या घालून परतवून घ्या. यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. त्यानंतर झाकण ठेवा.
गणेशोत्सव स्पेशल : बाप्पाला मोदक तर आवडतातच, पण यंदा करुन पाहा मोदकाची झणझणीत आमटी!
गॅस मध्यम आचेवर ठेऊन भाजी वाफेवर शिजवून घ्या. भाजी जास्त वेळ शिजवू नका. यामुळे भाजीची चव बदलू शकते. १५ मिनिटानंतर गॅस बंद करा. भाजी शिजली आहे की नाही चेक करा. भाजी शिजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे ५ पालेभाज्यांची गौराई स्पेशल भाजी रेडी. आपण या भाजीचा आस्वाद भाकरीसोबत घेऊ शकता.