Join us  

फराळाचं खाऊन कंटाळला असाल तर तोंडी लावायला करा गवारीच्या शेंगांचा झणझणीत ठेचा, तोंडाला चवच येईल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2023 9:07 AM

Gawar Shenga Thecha Recipe:दिवाळीमुळे मागच्या २- ३ दिवसांपासून सतत फराळाचे (Diwali Faral) पदार्थ खाणं चालू आहे. त्यामुळे जर कंटाळला असाल तर तोंडाला चव येण्यासाठी गवारीच्या शेंगांचा झणझणीत ठेचा करा (How to make string beans chutney?)....

ठळक मुद्देभाऊबीजेसाठी जो काही मेन्यू कराल, त्या मेन्यूमध्ये तोंडी लावायला गवारीच्या शेंगांचा ठेचा द्या. बघा जेवणात कशी रंगत येईल..

गवारीची भाजी अनेकांची नावडती. कुणी काही मसाले घालून वाटून- घाटून केली तर तिला थोडीफार पसंती मिळते. पण तरीही ती खूपच मनापासून खाल्ली जातेय, असं खूपच कमी ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणूनच आता थोडी रेसिपी बदला आणि गवारीच्या शेंगांची भाजी करण्याऐवजी तिचा झणझणीत ठेचा करा (How to make string beans thecha). तुम्ही भाऊबीजेसाठी जो काही मेन्यू कराल, त्या मेन्यूमध्ये तोंडी लावायला गवारीच्या शेंगांचा ठेचा द्या (gavar shenga chutney). बघा जेवणात कशी रंगत येईल.. गवारीच्या शेंगांचा चवदार ठेचा कसा करायचा ते आता पाहूया (How to make string beans chutney?)...

 

गवारीच्या शेंगांचा ठेचा करण्याची रेसिपीही रेसिपी इन्स्टाग्रामच्या aruna_vijay_masterchef या पेजवर शेअर करण्यात आली आहे.

साहित्य

२ कप गवारीच्या शेंगा

४५ लाखांचा ड्रेस आणि ३ लाखांची पर्स! शाहरुख खानची लेक सुहानाची महागडी स्टाईल पाहा..

८ ते ९ हिरव्या मिरच्या. हे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी- जास्त करू शकता.

१ टीस्पून हळद

चवीनुसार मीठ

१ टेबलस्पून तेल

१ टेबलस्पून लिंबाचा रस

फोडणीसाठी मोहरी, जिरे आणि चिमुटभर हिंग

 

कृती

सगळ्यात आधी गवारीच्या शेंगा धुवून त्या तोडून घ्या. मिरच्यांचे तुकडे करून घ्या.

आता गवारीच्या शेंगा, मिरच्या, हळद मिक्सरमध्ये टाका आणि बारीक वाटून घ्या.

मेकअप करण्यापूर्वी न विसरता करा ५ गोष्टी, तुमच्या सौंदर्याला लागतील चार चाँद- मस्त ग्लो येईल

हे वाटण आता एका वाटीत काढा आणि त्यात लिंबाचा रस पिळा. त्यानंतर त्यात  चवीनुसार मीठ घाला.

गॅसवर एक कढई तापायला ठेवा. त्यात तेल टाका. तेल तापलं की जिरे, मोहरी, हिंग टाकून फोडणी देऊन घ्या. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलं की झाला खमंग ठेचा तयार.

या रेसिपीमध्ये तुम्ही बदल करून तुमच्या आवडीनुसार लसूण, कढीपत्ता असे पदार्थही घालू शकता. 

 

टॅग्स :दिवाळी 2023अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.