Join us  

फक्त १ पदार्थ कणकेत मिसळला; केली मऊ-फुगलेली चपाती; जर्मन महिलेचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 3:21 PM

Viral Video German Woman Makes Roti Soft : भारतीय व्यक्तीबरोबर लग्न केल्यानंतर जर्मन महिला भारतीय रेसिपीज चपाती, पराठे यांसारख्या पदार्थांवर प्रयोग करत आहे

भारतीय स्वयंपाक करण्याच्या पद्धती जगभरात प्रसिद्ध होत आहेत. फक्त भारतीय  लोकच नाही तर परदेशी लोकसुद्धा हे पदार्थ खाण्यासाठी भारतात. अलिकडेच ब्लॉगर जोडी मोंटी आणि एंड्रिया  यांनी भारतीय पदार्थ बनवून सोशल मीडिया युजर्सना आश्चर्यचकीत केले आहे. (Viral Video German Woman Makes Roti Soft)

भारतीय व्यक्तीबरोबर लग्न केल्यानंतर जर्मन महिला भारतीय रेसिपीज चपाती, पराठे यांसारख्या पदार्थांवर प्रयोग करत आहे. अलिकडेच एंड्रिया नावाच्या एका जर्मन महिलेनं चपात्या सॉफ्ट बनवण्यासाठी एक युक्त शेअर केली आहे. ही क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून युजर्स लाईक्सचा वर्षाव करत आहेत. (Viral Video of german women makes roti soft by adding this secret ingredient)

ब्लॉगर @we_coffeemilkfamily या अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. ही क्लिप 1.1 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिली गेली आणि सुमारे 25 हजार लाईक्स मिळाले. जर्मन बाईने चपाती मऊ करण्यासाठी त्यात जो घटक टाकला तो एवोकॅडोशिवाय दुसरा काही नव्हता. पोस्टनुसार, थोडेसे मॅश केलेल्या एवोकॅडोने चपातीला खूप मऊ होण्यास मदत केली. थोडेसे पाणी घालून पीठ मळून घेणे, आणि नंतर नेहमीप्रमाणे रोट्या तयार करणे हे अतिरिक्त मऊ परिणाम देण्यासाठी आवश्यक आहे.

त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, "मला आधी वाटले, एवाकॅडो चपातीच्या पिठात नसते पण नंतर मला ते ट्राय करून पाहावे लागले.  नंतर मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना ही चपाती खायला दिली सर्वांना खूप आवडली. कारण ही चपाती कमी फुगलेली असतील तरी मऊ झालेली.

भाजीला काय करायचं सुचत नाही? १ कांदा चिरा-५ मिनिटांत करा कांद्याची चविष्ट भाजी; सोपी रेसिपी

चपातीमध्ये एवोकाडो मिसळून सॉफ्ट होण्याची ट्रिक व्हायरल होत आहे. एका युजरनं लिहीलं तुम्ही यात पालकही घालू शकता. दुसऱ्या एका युजरनं कमेंट केली मी सुद्धा याच पद्धतीनं चपाती बनवतो माझ्या मुलांना या प्रकारची चपाती फार आवडते. तुम्ही एवाकॅडोऐवजी बीटाची प्युरी सुद्धा वापरू शकता. खासकरून लहान मुलांसाठी हा उत्तम पर्याय आहे.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न