दुपारच्या उकाड्यात काहीतरी छान गार प्यावसं वाटतं. पण मग बाहेरचं नको म्हणून आपण घरीच सरबत तयार करून पितो. (Get ready for summer, check out the easy recipes for refreshments )लिंबू सरबत, कोकम सरबत पिऊन कंटाळा आला आहे का? इतरही वेगवेगळी सरबत बाजारात मिळतात. त्यात भरपूर प्रमाणात रसायने घातलेली असतात. आणि फळाचा अर्क अगदी नावासाठीच असतो. (Get ready for summer, check out the easy recipes for refreshments )त्या फळातील गुणधर्म शरीरासाठी चांगले असतात. पण त्यात घातलेल्या रसायनांमुळे त्यातील सत्व निघून जातात. फक्त गोडवा आणि थोडीशी सरबताची चव उरते. त्यापेक्षा सरबतांचे अर्क घरीच तयार करा. काहीच कठीण नसते. दोन सरबतांच्या रेसिपी पाहूया.
१. आवळा सरबत
कृती:
१. आवळे छान धुवून घ्या. नंतर पूर्णपणे कोरडे करून घ्या. त्यात अजिबात पाणी राहणार नाही याची काळजी घ्या. नाही तर अर्क जास्त काळ टिकणार नाही. (Get ready for summer, check out the easy recipes for refreshments )
२. आवळ्याचे पातळ-पातळ काप करा. किसून घेतलात तरी चालेल. काप करताना पातळचं करा. आवळ्याच्या बिया काढून घ्या.
३. आवळा मिक्समध्ये फिरवा, त्यात अजिबात पाणी वापरू नका. हवं तर थोडा-थोडा आवळा फिरवा.
४. आता बारीक झालेल्या आवळ्याचा अर्क काढून घ्या. एका पातेल्यावर पातळ कापड ठेवा. त्यामध्ये आवळा टाकून त्याचा अर्क काढा. पिळून पूर्ण रस काढा.
५. आता एका पातेल्यात साखर घ्या. तुमच्या आवडीनुसार साखर घ्या. त्यामध्ये आवळ्याचा रस घाला.
६.साखर पूर्ण विघळली की त्यात जीरं पूड, काळीमिरी पूड, मीठ घाला. जर हे सगळं घालायचं नसेल तरी चालेल. सगळं नीट उकळा.
७. सिरप गार करुन घ्या. एका बाटलीमध्ये ओता आणि साठवा.
२. बडीशेप सरबत
हे तयार करायला खुपच सोपं आहे. त्यामुळे प्रिमिक्स तयार करण्यापेक्षा आयत्या वेळी तयार करा.
१. बडीशेप , खडीसाखर, काळी मिरी, वेलची सगळं वेगवेगळं बारीक करून घ्या.
२. बडीशेपेच्या अर्ध बाकी साहित्याचं प्रमाण ठेवा. काळी मिरी थोडीच घाला.
३. सगळं एकदा एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घ्या.
दोन्ही सरबतं पाण्यात मीठ, सिरप घालून मस्त ढवळा आणि प्या.