Lokmat Sakhi >Food > खजूर खाण्याचा कंटाळा आला; करा खजुराची चटणी.. कशाबरोबरही खा लागते छानच!

खजूर खाण्याचा कंटाळा आला; करा खजुराची चटणी.. कशाबरोबरही खा लागते छानच!

हिवाळ्यात अवश्य खावी अशी चटणी म्हणजे खजुराची चटणी. ही चटणी  खाऊन मिळते टेस्ट आणि बनते हेल्थही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 08:01 PM2022-01-05T20:01:42+5:302022-01-05T20:09:29+5:30

हिवाळ्यात अवश्य खावी अशी चटणी म्हणजे खजुराची चटणी. ही चटणी  खाऊन मिळते टेस्ट आणि बनते हेल्थही!

Getting bored of eating dates; Make date chutney .. Taste best with anything! | खजूर खाण्याचा कंटाळा आला; करा खजुराची चटणी.. कशाबरोबरही खा लागते छानच!

खजूर खाण्याचा कंटाळा आला; करा खजुराची चटणी.. कशाबरोबरही खा लागते छानच!

Highlightsखजुराची चटणी करण्याआधी खजूर पाण्यात भिजवावे.खजुराच्या चटणीत काळं मीठ घातल्याने ती पाचकही होते.खजूर मिक्सरमधून वाटल्यानंतर होणारी प्युरी थोडी शिजवावी.

खजूर , मग ते ओले असू देत की सुके, बियांचे किंवा बियांशिवायचे. खजूर खाणं आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. खजूरमधून शरीराला आवश्यक कॅल्शियम आणि लोह हे दोन महत्त्वाचे घटक तर मिळतातच शिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही खजूर खाणं फायदेशीर असतं. पण नुसतेच खजूर खाल्ल्याने ते खावेसे वाटत नसतील तर अधून मधून खजुराचे पदार्थ तयार करुन त्याद्वारे खजूर पोटात गेले तरी खजूरापासून अपेक्षित फायदे शरीराला मिळतात. 

Image: Google

चव आणि पौष्टिकता देणारा खजुराचा पदार्थ म्हणजे खजुराची चटणी. ही चटणी हिवाळ्यात अवश्य खावी असं आरोग्य तज्ज्ञ म्हणतात. थंड वातावरणात शरीराला हवी असणारी ऊब खजुराच्या चटणीतून मिळते. खजुराची चटणी पौष्टिकतेचे सर्व नियम पाळून केल्यास ती जेवढी आरोग्यदायी होते तितकीच ती चविष्टही लागते.  पराठे, पोळी, खिचडी यांच्यासोबत खजुराची चटणी खाल्ल्यास तोंडाला चव येते.

Image: Google

कशी करावी खजुराची चटणी?

खजुराची चटणी करण्यासाठी 100 ग्रॅम खजूर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळं मीठ, 2 चमचे सुकामेवा, चवीनुसार मीठ एवढं साहित्य घ्यावं. 

खजुराची चटणी करताना खजुरातील बिया काढून खजूर दोन तास पाण्यात भिजवावेत. दोन तासांनी भिजलेले खजूर पाण्यातून काढून कढई गरम करुन थोडे परतून घ्यावेत. परतलेले खजूर गार झाले की ते मिक्सरमधून बारीक करावेत.  मिक्सरमधून खजुराची प्युरी तयार होते. या खजुराच्या पातळ मिश्रणात तिखट, काळं मीठ आणि जिरे पावडर घालून ते चांगलं मिसळून घ्यावं.

Image: Google

खजुराचं हे मिश्रण पुन्हा कढईत घालून थोडं शिजवून घ्यावं. यामुळे खजुराच्या चटणीला आवश्यक असलेला दाटसरपणा येतो.  मिश्रण शिजत असताना त्यात थोडे बारीक तुकडे केलेला सुकामेवा घालावा. काजू, बदाम, अक्रोड हे किंवा यातलं जे आवडेल ते अगदी बारीक तुकडे करुन किंवा किसून घालावं. सुकामेवा घालून चटणी चांगली हलवून घ्यावी. नंतर त्यात चवीपुरतं साधं मीठ घालावं. ही चटणी जेवताना पोळी, पराठ्यासोबत किंवा नाश्त्याला पोह्या- उपम्यासोबतही छान लागते. खजूर खाण्याचा येणारा कंटाळा खजुराची चटणी खाऊन घालवता येतो. 

Web Title: Getting bored of eating dates; Make date chutney .. Taste best with anything!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.