Lokmat Sakhi >Food > कियारा- सिद्धार्थच्या लग्नात पाहुण्यांचे तोंड गोड करणारे राजस्थानी घोटवन लाडू, पाहा स्पेशल पारंपरिक रेसिपी...

कियारा- सिद्धार्थच्या लग्नात पाहुण्यांचे तोंड गोड करणारे राजस्थानी घोटवन लाडू, पाहा स्पेशल पारंपरिक रेसिपी...

Ghotua Laddu Traditional Rajasthani Recipe Kiara Siddharth Wedding Special Sweet Dish : कमी वेळात होणारी सोपी राजस्थानी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2023 01:55 PM2023-02-12T13:55:44+5:302023-02-12T13:57:06+5:30

Ghotua Laddu Traditional Rajasthani Recipe Kiara Siddharth Wedding Special Sweet Dish : कमी वेळात होणारी सोपी राजस्थानी रेसिपी...

Ghotua Laddu Traditional Rajasthani Recipe Kiara Siddharth Wedding Special Sweet Dish :Rajasthani Ghotvan Ladoo that sweetened the mouths of the guests at Kiara-Siddharth's wedding, see the special traditional recipe... | कियारा- सिद्धार्थच्या लग्नात पाहुण्यांचे तोंड गोड करणारे राजस्थानी घोटवन लाडू, पाहा स्पेशल पारंपरिक रेसिपी...

कियारा- सिद्धार्थच्या लग्नात पाहुण्यांचे तोंड गोड करणारे राजस्थानी घोटवन लाडू, पाहा स्पेशल पारंपरिक रेसिपी...

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ म्हलोत्रा यांचा विवाहसोहळा नुकताच राजस्थानमध्ये संपन्न झाला. बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या या दोघांचे नाते आता अधिकृत झाले. चाहते आतुरतेने वाट पाहत असलेल्या या शाही विवाह सोहळ्याला दोघांच्या घरातील आणि जवळची मोजकीच मंडळी उपस्थित होती. जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेस येथे ४ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारीपर्यंत हा विवाहसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांचे अतिशय उत्तम अगत्य दोन्ही परीवाराकडून करण्यात आले होते (Ghotua Laddu Traditional Rajasthani Recipe Kiara Siddharth Wedding Special Sweet Dish). 

लग्नाच्या दिवशी १० देशांतील जवळपास १०० मेन्यू याठिकाणी करण्यात आले होते. इतकेच नाही तर ब्रेकफास्ट आणि लग्नाच्या आधीच्या दिवसांतही अतिशय उत्तम मेन्यू असल्याने पाहुण्यांच्या पोटाची काळजी घेण्यात आली होती. यामध्ये इटालियन, चायनिज, अमेरिकन, साऊथ इंडियन, मॅक्सिकन, पंजाबी, गुजराथी पदार्थांबरोबरच विविध प्रकारच्या मिठाईचा आणि गोड पदार्थांचाही समावेश होता. राजस्थानमधील पारंपरिक रेसिपी असलेले घोटवन लाडू हे या सोहळ्यातील प्रमुख आकर्षण होते. हे लाडू कसे केले जातात याविषयी...

(Image : Google)
(Image : Google)

साहित्य -

१. बेसन - २ वाट्या 

२. तूप - १ वाटी 

३. साखर - २ वाट्या 

४. खवा - १ वाटी 

५. वेलची पावडर - पाव चमचा 

६. काजू, बदाम - १० ते १५ 

कृती -

१. बेसन पीठ घेऊन ते चांगले चाळून घ्या.

२. कढई गरम करुन त्यामध्ये बेसन सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. भाजताना चांगले हलवत राहा.

३. सोनेरी रंग आला की एका ताटलीत हे बेसन काढून थोडे गार करायला ठेवा.

४. याच कढईत तूप घालून त्यात खवा गरम करुन घ्या.

५. खवा चांगला परतला गेला की तो या थंड झालेल्या बेसनात घाला. 

६. पिठीसाखर करुन आवडीनुसार ती यामध्ये घाला, मग वेलची पूड घाला.

७. सगळे हाताने चांगले एकजीव करुन घ्या म्हणजे गठुळे राहणार नाहीत. 

८. आवश्यकतेनुसार यामध्ये तूप घाला आणि हाताने लाडू मळून घ्या.

९. आवडत असतील तर ड्रायफ्रूटस आतमध्ये घाला नाहीतर काप करुन वरुन लावले तरी चालतात. 


 

Web Title: Ghotua Laddu Traditional Rajasthani Recipe Kiara Siddharth Wedding Special Sweet Dish :Rajasthani Ghotvan Ladoo that sweetened the mouths of the guests at Kiara-Siddharth's wedding, see the special traditional recipe...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.