Lokmat Sakhi >Food > साऊथ इंडियन लालेलाल चविष्ट ‘अल्लम चटणी’ आता करा घरी, डोशाची वाढेल रंगत..चव अशी की वाह!

साऊथ इंडियन लालेलाल चविष्ट ‘अल्लम चटणी’ आता करा घरी, डोशाची वाढेल रंगत..चव अशी की वाह!

ginger chutney recipe | allam pachadi | adrak chatni आल्याचा बोटभर तुकडा डोसा-इडलीची चवच करुन टाकेल एकदम आगळी, नाश्ता करा पोटभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 02:05 PM2023-06-14T14:05:43+5:302023-06-14T14:45:06+5:30

ginger chutney recipe | allam pachadi | adrak chatni आल्याचा बोटभर तुकडा डोसा-इडलीची चवच करुन टाकेल एकदम आगळी, नाश्ता करा पोटभर

ginger chutney recipe | allam pachadi | adrak chatni | साऊथ इंडियन लालेलाल चविष्ट ‘अल्लम चटणी’ आता करा घरी, डोशाची वाढेल रंगत..चव अशी की वाह!

साऊथ इंडियन लालेलाल चविष्ट ‘अल्लम चटणी’ आता करा घरी, डोशाची वाढेल रंगत..चव अशी की वाह!

रोजच्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी आपण आपल्या ताटात चटणीचा समावेश करतो. भारतात चटणीचा खवय्यावर्ग फार मोठा आहे. चटणीचे अनेक प्रकार केले जातात. मुख्य म्हणजे दक्षिण भारतात चटणीचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. इडली, डोसा, उतप्पा, मेदू वडा या पदार्थांसोबत चटणी खायला दिली जाते.

आपण खोबऱ्याची, भोपळ्याची, कारा चटणी खाऊन पाहिली असेल, पण आपण कधी आल्याची चटणी खाऊन पाहिली आहे का? आल्याची चटणी बोरिंग जेवणाची रंगत वाढवते. ही चटणी चवीला भन्नाट व आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. जर आपल्याला रोजची तिच चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर, आल्याची चटकदार चटणी करून पाहा(ginger chutney recipe | allam pachadi | adrak chatni).

आल्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

आले - 100 ग्रॅम

लसूण - २ टीस्पून

चना डाळ - 1 टीस्पून

उडीद डाळ - 1 टीस्पून

मेथी दाणे - 1/4 टीस्पून

जिरे - 1 टीस्पून

चिंच - 50 ग्रॅम

गूळ - 100 ग्रॅम

सुक्या लाल मिरच्या - 25-30

कुंद-मंद पावसाळी हवेत करायलाच हवा झणझणीत टोमॅटो रस्सा, तोंडाला येईल चव-जेवण होइल मस्त

धणे - 1 टेस्पून

तेल - 2-3 चमचे

मीठ - चवीनुसार

पाणी - अर्धा कप

फोडणीसाठी साहित्य

चना डाळ - १/२ टीस्पून

उडीद डाळ - १/२ टीस्पून

मोहरी - 1 टीस्पून

हिंग - १ चिमूटभर

चिरलेली कढीपत्ता - 1 टीस्पून

सुक्या लाल मिरच्या - २-३

तेल - 2 चमचे

कृती

साऊथ इंडियन स्टाईल आल्याची चटणी करण्यासाठी सर्वप्रथम, आले स्वच्छ धुवून घ्या. यानंतर आल्याचे बारीक तुकडे करा. आता कढईत २ चमचे तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात आल्याचे तुकडे घालून भाजून घ्या. आल्याचा रंग जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत आलं भाजून घ्या. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला लसूण घालून भाजून घ्या. दोन्ही गोष्टी भाजून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून ठेवा.

आता कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात चणा डाळ, उडीद डाळ, धणे, जिरे आणि मेथी घालून भाजून घ्या. मसाले भाजून झाल्यानंतर त्यात सुक्या लाल मिरच्या घालून मंद आचेवर भाजून घ्या. यानंतर, गॅस बंद करा आणि सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. व पाणी न घालता मिश्रण बारीक करून घ्या. मसाले बारीक झाल्यानंतर त्यात भाजून घेतलेलं आलं आणि लसूण घाला. व याची पेस्ट तयार करा. आता त्यात चिंचेचा कोळ, गुळ, चवीनुसार मीठ घालून पेस्ट तयार करा. पेस्ट तयार झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून ठेवा.

‘बाँबे चटणी’ खाल्लीच नसेल तर काय मजा? २ चमचे पिठात होते झटपट चविष्ट चटणी

तडका तयार करण्यासाठी फोडणीच्या भांड्यात २ टेबलस्पून तेल घाला, व त्यात मोहरी, चणा डाळ, उडीद डाळ, ३ सुक्या लाल मिरच्या, कडीपत्ता, चिमुटभर हिंग, घालून मिक्स करा. मसाले भाजून झाल्यानंतर गॅस बंद करा. व हा तडका चटणीवर घालून मिक्स करा. अशा प्रकारे साऊथ इंडियन स्टाईल चटकदार चटणी खाण्यासाठी रेडी.

Web Title: ginger chutney recipe | allam pachadi | adrak chatni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.