आलं आणि लसूण हे दोन्ही पदार्थ रोजच्या जेवणातील मुख्य घटक आहेत. आलं, लसूण घातल्याशिवाय अन्नाला चव येणं कठीणच. बरेच लोक घरात आलं आणि लसूण पेस्ट बनवून ठेवतात. रोजची भाजी बनवायला घेतली की आलं लसणीची पेस्ट तयार असेल तर काम वाचतं आणि वेळही वाचतो. अनेकदा घरात तयार केलेली आलं लसणाची पेस्ट फ्रिजमध्ये साठवून ठेवली की २ दिवसांनी काळपटपणा येतो, खराब झाली असावी असं वाटतं.
साठवताना आणि तयार करताना काही टिप्स वापरल्या तर ही पेस्ट जास्त दिवस टिकवून ठेवता येऊ शकते. खरं तर, घरगुती आलं आणि लसूण पेस्ट बंद पाकिटातील वापरण्यापेक्षा घरीच तयार केलेली उत्तम ठरते आणि बर्याच काळासाठी सहजपणे साठवली जाऊ शकते. बाजारात उपलब्ध आलं-लसूण पेस्टमध्ये भेसळ असण्याची शक्यता देखील असते.
साहित्य
लसणाच्या सोललेल्या पाकळ्या- १ वाटी
एक सोललेला मोठा आल्याचा तुकडा
तेल- ३ चमचे
मीठ- १ चमचा
कृती
महत्वाची गोष्ट अशी की आपण आपल्या आवडीनुसार आलं आणि लसणाचे प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता. काहींना आल्याची चव तर काहींना लसणाची चव आवडते. या दोन घटकांमध्ये दोन चमचे तेल मिसळून वाटून घ्या. एकदा बारीक झाल्यावर भांड्याचे झाकण काढून त्यात उरलेलं तेल आणि मीठ एकजीव करा. चांगले वाटल्यानंतर त्याची बारीक पेस्ट तयार होईल आणि ही पेस्ट एका भांड्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा. आलं-लसूण पेस्टमध्ये अजिबात पाणी वापरू नका.
आपण आलं आणि लसूण पेस्ट ठेवण्यासाठी वापरत असलेलं भांडं पूर्णपणे कोरडे असले पाहिजे. भांडं जरा ओलसर असेल तर पेस्ट लवकर खराब होऊ शकते. रोजच्या वापरासाठी आलं लसूण पेस्ट तसेच काढण्यासाठी कोरडा चमचा वापरा. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही आले आणि लसूण पेस्ट फ्रिजमध्ये ठेवता तेव्हा ते कमीतकमी दोन महिने सहज साठवली जाऊ शकते.
जर आपल्याला 4 ते 6 महिन्यांसाठी आलं, लसूण पेस्ट साठवायची असेल तर यासाठी आईस ट्रे वापरा. चमच्याच्या मदतीने बर्फाचा ट्रे भरा आणि त्यास प्लास्टिकच्या बॅगमध्ये लपेटून घ्या आणि 12 तास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. 12 तासांनंतर जेव्हा ते बर्फ क्यूबमध्ये बदलेल, तेव्हा ते एक एक करून काढून घ्या आणि एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत पॅक करून पिशवी बंद करा. नंतर पुन्हा फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आपण हे एक-एक करून वापरू शकता.
त्यात व्हिनेगर वापरल्यास आलं, लसूण पेस्ट 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ साठवता येते. यासाठी, जेव्हा आपण आलं आणि लसूण पेस्ट एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवता तेव्हा त्यावर 3 ते 4 चमचे व्हिनेगर घाला. व्हिनेगरच्या वापरासह आले आणि लसूण पेस्टचा रंग थोडा बदलला असला तरी तो बराच काळ ताजा राहील. सुरुवातीला व्हिनेगर वापरू नका, अगदी शेवटी ठेवा. या टिप्सच्या मदतीने आपण बर्याच वेळासाठी आले आणि लसूण पेस्ट साठवून शकता.