Join us

शेंगदाण्याच्या ठेच्याला द्या खास ट्विस्ट, फक्त १० मिनिटात झणझणीत तोंडीलावणे, खा दोन घास जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2025 19:43 IST

Give a special twist to peanut thecha, make a spicy mouth-watering treat in just 10 minutes : ठेचा म्हणजे अस्सल मराठी पदार्थ. पाहा ठेच्याची जरा वेगळी रेसिपी.

भाकरी बरोबर ठेचा हा पदार्थ फारच मस्त लागतो. तिखट प्रेमींनी तर हा ठेचा खायलाच हवा. ही रेसिपी जरा हटके आहे. नेहमीपेक्षा जरा वेगळी पद्धत आहे. (Give a special twist to peanut thecha, make a spicy mouth-watering treat in just 10 minutes)पाहा ही झणझणीत रेसिपी.

साहित्यशेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची, तेल, कांदा, कोथिंबीर, आलं, मीठ, जिरे, हळद, हिंग, कडीपत्ता

कृती१. एका कढईमध्ये शेंगदाणे परता. त्यामध्ये तेल घालू नका. (Give a special twist to peanut thecha, make a spicy mouth-watering treat in just 10 minutes)सुकेच परता. जरा रंग बदलला आणि सालं सुटायला लागतात  मग गॅस बंद करा. शेंगदाणे एका फडक्यामध्ये भरा. फडक्यामध्ये दाणे नीट गुंडाळा आणि मग फडक्याचे टोक धरुन शेंगदाणे जमिनीकर किंवा ओट्यावर आपटा. असे केल्याने शेंगदाण्याची साल निघते. मग फडके उघडून सालं काढा व शेंगदाणे छान मोकळे करुन घ्या.

२. एका तव्यावर किंवा कढईमध्ये तेल घ्या. त्यामध्ये जिरे घाला. जिरं छान फुल्ले  की मग त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घाला. लसूण छान भरपूर वापरा. लसूण जरा छान परतली गेली की त्यामध्ये हिरवी मिरची घाला. मिरचीला मधे एक कट द्या. तुकडे करायची गरज नाही. मिरची मस्त खमंग परतून घ्या. 

३. त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाका. कोथिंबीर मस्त परतून घ्या. व्यवस्थित परतल्यावर त्यामध्ये चवीपुरते मीठ घाला. छान किसलेलें आलं घाला. अगदी थोडे हिंग घाला. हिंग वापरायचे कारण मग ठेचा बाधत नाही. त्यामध्ये थोडीशी हळद घाला. सगळं छान परतून घ्या. नंतर गॅस बंद करा आणि गार करत ठेवा. 

४. एका कढईमध्ये थोडेसे तेल घ्या. तेल जरा गरम झाले की त्यामध्ये जिरे घाला. जिरे छान खमंग परता. त्यामध्ये कडीपत्ता घाला. कांदा मस्त बारीक चिरुन घ्या. कडीपत्ता जरा कुरकुरीत झाल्यावर कांदा घाला. कांदा छान गुलाबी होईपर्यंत परता.

५. दाण्याचे मिश्रण छान गार झाल्यावर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या. जाडसर वाटून घ्या. त्यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालू नका. वाटून झाल्यावर एका वाटीमध्ये काढून घ्या.

६. वाटलेले शेंगदाण्याचे मिश्रण कढईमधल्या कांद्याच्या फोडणीमध्ये टाका. छान खमंग परता. कांद्याचे मिश्रण आणि शेंगदाण्याचे मिश्रण एकजीव करुन घ्या.    

टॅग्स :अन्नपाककृतीमहाराष्ट्र