Lokmat Sakhi >Food > हिरव्यागार भाज्यांना द्या हटके ट्विस्ट, स्टार्टरसाठी आजच बनवा हॉटेलस्टाईल हरियाली कबाब..

हिरव्यागार भाज्यांना द्या हटके ट्विस्ट, स्टार्टरसाठी आजच बनवा हॉटेलस्टाईल हरियाली कबाब..

Make Restaurant Style Hariyali/HaraBhara Kabab घरातील सदस्य कधी - कधी हिरव्या भाज्या खाण्यास नकार देतात, त्यांच्यासाठी बनवा हरीयाली कबाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2023 07:16 PM2023-01-23T19:16:38+5:302023-01-23T19:17:45+5:30

Make Restaurant Style Hariyali/HaraBhara Kabab घरातील सदस्य कधी - कधी हिरव्या भाज्या खाण्यास नकार देतात, त्यांच्यासाठी बनवा हरीयाली कबाब

Give green vegetables a twist, make Hotel Style Hariyali Kebab today for starter.. | हिरव्यागार भाज्यांना द्या हटके ट्विस्ट, स्टार्टरसाठी आजच बनवा हॉटेलस्टाईल हरियाली कबाब..

हिरव्यागार भाज्यांना द्या हटके ट्विस्ट, स्टार्टरसाठी आजच बनवा हॉटेलस्टाईल हरियाली कबाब..

स्टार्टर किंवा सायंकाळची छोटी भूक भागवण्यासाठी आपल्या घरात विविध पदार्थ बनवले जातात. काही पदार्थ हेल्दी असतात तर काही अनहेल्दी. सध्या हिरव्या भाज्यांचा सिझन सुरू आहे. आपण या हिरव्या भाज्यांपासून हरियाली कबाब बनवू शकता. हरियाली कबाबला हरभरा कबाब देखील म्हणतात. हे कबाब फार पौष्टिक असतात. यामध्ये प्रथिने, कँलरिज, अँटिऑक्सिडंट, व्हिटामिन, प्रोटीन भरपूर प्रमाणात आढळते. महत्वाचे म्हणजे ज्यांना ह्रुदय विकाराचा त्रास आहे, किंवा ज्यांना वजन कमी करायचे आहे अथवा ज्यांना मधुमेह आहे ते देखील हा पदार्थ खाऊ शकता. लहान मुलांना हे कबाब खूप आवडतील.

हरियाली कबाब बनवण्यासाठी लागणारं साहित्य

पालक

हिरवे मटार

हिरवी मिरची

लसूण

कोथिंबीर

उकडलेला बटाटा

ब्रेड क्रम्स

कोर्न फ्लोर

गरम मसाला

मीठ

धणे पावडर

चाट मसाला पावडर

आमचूर पावडर

आलं लसूण पेस्ट

काजू

कृती

सर्वप्रथम, एका पॅननध्ये पाणी गरम करत ठेवा. त्यात पालक आणि मटार शिजवत ठेवा. पालक आणि मटार शिजल्यानंतर एका बाऊलमध्ये काढा. दुसरीकडे मिस्करचं भांडं घ्या, त्यात शिजवलेले मटार आणि पालक टाका. त्यानंतर हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर टाकून संपूर्ण मिश्रण बारीक करून घ्या. मिश्रण बारीक झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात उकडून कुस्कुरून घेतलेला बटाटा, ब्रेड क्रम्स, कोर्न फ्लोर, गरम मसाला, मीठ, धणे पावडर, चाट मसाला पावडर, आमचूर पावडर, आलं - लसूण पेस्ट टाकून संपूर्ण मिश्रण मिक्स करा.

संपूर्ण मिश्रण मिक्स झाल्यानंतर हाताला तेल लावा. आणि त्या मिश्रणाचे छोटे छोटे कबाब तयार करा. डेकोरेशनसाठी त्याच्या मधोमध एक काजू ठेवा. एका नॉन स्टिक पॅनवर थोडे तेल टाकून गरम करत ठेवा. त्यावर तयार टिक्की सोनेरी रंग येउपर्यंत दोन्ही बाजूने भाजून घ्या. अशा प्रकारे चविष्ट हरियाली कबाब खाण्यासाठी रेडी. आपण हे हरभरा कबाब गोड अथवा हिरव्या चटणीसह खाऊ शकता.

Web Title: Give green vegetables a twist, make Hotel Style Hariyali Kebab today for starter..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.