शुभा प्रभू साटम
आज आपण एक तसा सर्वपरिचित पण वेगळा ट्विस्ट दिलेला प्रकार पाहू. टोमॅटो धिरडे आपल्याला नवे नाही,त्यामध्ये काही वेगळी भर घालून आपला हा आजचा पदार्थ करणार आहोत. होतं कसं की ठराविक पदार्थ ठराविक पद्धतीने करून खायची आपली सवय असते. त्याचा कंटाळा येतोच येतो,बरं फार काही वेगळं केलं तर ते आवडेल याची शाश्वती नसते, म्हणून परिचित रेसिपी थोड्या बदलल्या की मस्त वेगळं असं काही तयार होतं. ते ही कमी श्रमात, लवकर आणि चविष्ट. पौष्टिकही. आज असेच वेगळे टोमॅटो धिरडे आपण बघूया, ज्यात टोमॅटो असेलच, पण थोडे अधिक काही पण आहे.. आणि तोच त्यातला ट्विस्ट आहे ...
साहित्य
बेसन १ वाटीथोडे तांदूळ पीठटोमॅटो बारीक चिरूनआले मिरची कोथिंबीर बारीक चिरून किंवा लाल तिखटहळद थोडा ओवा(बेसन काहीजणांना बाधू शकते)मीठ साखर चवीप्रमाणेत्यात घालण्यासाठीपालक/कोबी/मेथी बारीक चिरूनपनिर कुस्करूनमश्रुम चिरूनशिमला चौकोनी तुकडे करूनगाजर किसूनयातला कोणताही पदार्थ आपल्या आवडीप्रमाणे कसाही आपण घेऊ शकता. कितीही प्रमाणात.
कृती
नेहमीप्रमाणे सर्व पदार्थ एकत्र करून सरसरीत करायचे आणि त्याची छोटी छोटी धिरडी काढायची.अतिशय वेगळे असे हे धिरडे पौष्टिक आहेच पण चविष्ट पण लागते,तेल न घालता बटर वापरलं तर मस्त चव येते. त्यामुळे करुन पहा, नेहमीच्या टोमॅटो धिरड्याला द्या पालक-पनीर ट्विस्ट.
(लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)