वरण म्हणजे कम्फर्ट फुड (Varan - Bhaat). अनेक घरांमध्ये भाज्यांपेक्षा डाळ जास्त आवडीने खाल्ली जाते (Varan). वरण -भात खाल्ल्याशिवाय अनेकांचा दिवसच पूर्ण होत नाही (Food). पण नेहमी नेहमी त्याच चवीचा वरण भात खाऊन कंटाळा येतो (Cooking Tips). जेवणामध्ये काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते. वरण - भाताशिवाय आपल्याला वेगळा काही पर्याय उरत नाही. पण जर वरण वेगळ्या पद्धतीनं करून पाहू शकता.
आपण कधी गोवास्टाईल वरण करून पाहिलं आहे का? गोव्यातील पदार्थ जगभरात प्रसिद्ध आहे. त्याची चवही वेगळी आणि भन्नाट लागते. जर आपल्याला रोजच्या पद्धतीचे वरण खाऊन कंटाळा आला असेल तर, एकदा गोवास्टाईल पौष्टीक वरण करून खा. आपल्याला हे चमचमीत वरण नक्कीच आवडेल(Goan Varan bhaat recipe (Varan recipe with coconut)).
गोवास्टाईल वरण करण्यासाठी लागणारं साहित्य
चणा डाळ
मसूर डाळ
पाणी
हिरवी मिरची
टोमॅटो
ओलं खोबरं
हळद
मोहरी
जिरं
कडीपत्ता
हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी
तेल
कृती
एका भांड्यात एक वाटी चणा डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ घ्या. त्यात पाणी घालून डाळी धुवून घ्या. नंतर त्यात पाणी घालून डाळ शिजत ठेवा. डाळ शिजल्यानंतर त्यात लांब चिरलेली हिरवी मिरची, आणि टोमॅटो घाला. नंतर चवीनुसार मीठही घाला. आणि चमच्याने मिक्स करा. डाळीसोबत टोमॅटोही शिजेल. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
दुसरीकडे ओलं नारळ घ्या, आणि खोबरं खवून घ्या. खवलेलं खोबरं मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. नंतर त्यात चिमुटभर हळद, थोडं पाणी घालून वाटून घ्या. त्यात वाटण डाळीमध्ये घालून मिक्स करा. आता फोडणीच्या पळीत २ चमचे तेल घाला. त्यात एक चमचा मोहरी, जिरं, कडीपत्ता घाला. तयार फोडणी वरणामध्ये ओतून मिक्स करा. २ मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवा. अशा प्रकारे चमचमीत गोवास्टाईल वरण रेडी.