सर्वत्र 'गोविंदा रे गोपाळा' म्हणत लोकं जन्माष्टमी साजरी करीत आहे. या दिवशी भगवान श्री कृष्णांची आराधना केली जाते. व त्यांना आवडणारे पदार्थ तयार करून नैवद्य दाखवले जाते. असे म्हटले जाते की, त्यांना दुधापासून तयार केलेले पदार्थ फार आवडतात. यासह सुदाम्याचे पोहे देखील ते चवीने खायचे. सुदामा हा त्यांचा मित्र होता.
भगवान श्री कृष्ण व त्यांच्या मित्रांची रासलीला ही सर्वांनाच ठाऊक आहे. सुदामा हे खास आपल्या मित्रासाठी पोहे तयार करायचे. पोहे आणि दह्यापासून तयार हा पदार्थ चवीला भारी व आरोग्यासाठी पौष्टीक मानला जातो. चला तर मग सुदाम्याचे पोहे कसे तयार करायचे पाहूयात(Gokulashtami Special: This Gokulashtami make Sudama pohe for Lord Krishna).
सुदाम्याचे पोहे करण्यासाठी लागणारं साहित्य
पोहे
दही
हिरवी मिरची
गुळ
आता तंदूरी रोटी खाण्यासाठी ढाब्यावर जायची गरज नाही, घरच्या पॅनवर करा ढाबास्टाईल तंदुरी रोटी
खोबरं
मीठ
कोथिंबीर
डाळिंब्याचे दाणे
कृती
सर्वप्रथम, एका चाळणीमध्ये एक वाटी पोहे घ्या. त्यात थोडं पाणी घालून पोहे भिजवून घ्या. ज्याप्रमाणे आपण कांदे - पोह्यांसाठी पोहे भिजवतो, त्याचप्रमाणे पोहे भिजवून घ्यायचे आहे. भिजवलेले पोहे एका बाऊलमध्ये काढून घ्या.
केळी लवकर खराब होऊ नयेत, काळी पडू नयेत म्हणून २ टिप्स, केळी राहतील ताजी
त्यात तीन टेबलस्पून दही, दोन बारीक चिरलेली हिरवी मिरची, एक टेबलस्पून किसलेला गुळ, बारीक चिरलेला खोबरं, चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून साहित्य चमच्याने मिक्स करा. शेवटी डाळिंब्याचे दाणे पसरवून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे झटपट सुदाम्याचे पोहे खाण्यासाठी रेडी.