Join us  

१५ मिनिटांत करा झटपट ‘गोळी इडली', तांदळाच्या पिठाची इडली खाऊन तर पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2023 5:48 PM

Goli Idli Recipe: A Quick South Indian Breakfast In Just 15 Minutes डाळ तांदूळ न भिजवताही करता येते झटपट इडली, हलकी आणि सॉफ्ट

सकाळी - सकाळी उठल्यानंतर नवीन पदार्थ कोणता खावा हे कळत नाही. भरपेट नाश्ता केल्याने शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. त्यामुळे सकाळचा नाश्ता करायलाच हवा. नाश्त्यामध्ये आपण पोहे, उपमा, इडली, डोसा, मेदू वडा हे पदार्थ खातो. पण तेच - तेच पदार्थ खाऊन अनेकदा कंटाळा येतो. आपल्याला नाश्त्यामध्ये काहीतरी हटके खायचे असेल तर गोळी इडली ही रेसिपी ट्राय करून पाहा.

आपण सगळ्यांनी इडली हा पदार्थ खाल्ला असेल, पण कधी गोळी इडली ही रेसिपी ट्राय केली आहे का? इडली चवीला उत्तम व आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. पण ती बनवण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात. आपल्यला झटपट काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली असेल तर, गोळी इडली ही रेसिपी ट्राय करून पाहा(Goli Idli Recipe: A Quick South Indian Breakfast In Just 15 Minutes).

गोळी इडली करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदळाचं पीठ

पाणी

तेल

मीठ

जिरं

मोहरी

हिंग

ना पाक करण्याची झंझट, ना लाडू फसण्याची भीती, झटपट करा रव्याचे लाडू!

कडीपत्ता

हिरवी मिरची

लाल तिखट

कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम, गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा, त्यात एक ग्लास पाणी, एक चमचा मीठ व एक चमचा तूप किंवा तेल घालून गॅसची फ्लेम हाय ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात एक कप तांदळाचं पीठ घालून चमच्याने ढवळत राहा. आता त्यावर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवा, वाफ आल्यानंतर झाकण काढा, व चमच्याने हे पीठ एका परातीत काढून ठेवा. हलक्या हाताने पीठ चांगले मळून घ्या. व त्याचे छोटे - छोटे गोळे तयार करा.

हॉटेलस्टाइल व्हेज सोया ६५ घरी करण्याची परफेक्ट रेसिपी, स्टार्टर म्हणून मस्त चटकदार पदार्थ

एका चाळणीत हे गोळे काढून घ्या, व ज्याप्रमाणे आपण इडली वाफेवर शिजवतो त्याचप्रमाणे, गोळी इडली शिजवून घ्या. दुसरीकडे कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे तेल, जिरं, मोहरी, हिंग, कडीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट घालून साहित्य परतवून घ्या. २ मिनिटानंतर तडक्यामध्ये तयार गोळी इडली घालून मिक्स करा. शेवटी कोथिंबीर पसरवून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे गोळी इडली खाण्यासाठी रेडी. आपण ही रेसिपी सॉस किंवा चटणीसह खाऊ शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स